AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ओमराजे निंबाळकर यांच्याकडून थेट मोठी खेळी, घडामोडींना वेग, भाजपाच्या नेत्यांसोबत संघाच्याही..

खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेना ठाकरे गटातून तब्बल 6 खासदारांनी मोठी बंडखोरी केली. यादरम्यानच आता ओमराजे निंबाळकर यांच्याकडून मोठी खेळी खेळण्यात आलीये.

ओमराजे निंबाळकर यांच्याकडून थेट मोठी खेळी, घडामोडींना वेग, भाजपाच्या नेत्यांसोबत संघाच्याही..
MP Omraje Nimbalkar
| Updated on: Jul 11, 2026 | 8:45 AM
Share

शिवसेना ठाकरे गटातून तब्बल 6 खासदारांनी मोठी बंडखोरी केली. लोकसभा अध्यक्षांची भेट घेत त्यांनी स्वतंत्र गट स्थापनेबद्दलचे पत्र दिले. त्यानंतर यांनी मुंबईत दाखल होत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का होता. 6 खासदारानंतर सचिन आहिर यांनीही उद्धव ठाकरेंची साथ सोडली. या 6 खासदारांपैकी एक ओमराजे निंबाळकर देखील होते. ओमराजे निंबाळकर यांनीही मोठी बंडखोरी केली. उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानतंर ओमराजे निंबाळकर यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून टार्गेट करण्यात आले. उद्धव ठाकरे यांनी ओमराजे निंबाळकर यांच्या मतदार संघात सभा घेतली आणि त्यांच्यावर जोरदार टीका केली. यादरम्यानच आता ओमराजे निंबाळकर त्यांच्या मतदार संघात सक्रिय झाले.

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडून स्थानिक राजकारणात मोठी खेळी करण्यात आली. एकीकडे भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटलांना कडाडून विरोध तर दुसरीकडे भाजप नेत्यांच्या खासदार ओमराजे निंबाळकरांकडून गाठीभेटी सुरू आहेत. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यात विविध चर्चांना उधाण आले.

फक्त भाजपा नेतेच नाही तर ओमराजे निंबाळकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या देखील भेटी घेतल्या आहेत. भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शेषाद्री अण्णा डांगे यांचीही भेट ओमराजे निंबाळकर यांनी घेतली. ही सदिच्छा भेट होती.

यादरम्यानच ओमराजे निंबाळकर यांनी फेसबुकवर एक पोस्टही शेअर केली. ओमराजे निंबाळकर यांनी पोस्टमध्ये म्हटले की, माझा विरोध कोणत्याही पक्षाला नाही तर राजकारणातील नीच प्रवृत्ती द्वेषाचे राजकारण आणि समाजहिताचा बाद आणणाऱ्या वृत्तीला आहे. भाजप नेत्याच्या भेटीनंतर ओमराजे निंबाळकर यांनी अशाप्रकारची ही एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट ओमराजे निंबाळकर यांनी घेतली. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर ओमराजे निंबाळकर यांच्याकडून धाराशिव जिल्ह्यातील भाजपा नेत्यांच्या भेटी घेतल्या जात आहेत. मात्र, भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या कुटुंबासोबत संघर्ष कायम राहणार असल्याचेही यावरून स्पष्ट दिसत आहे. ओमराजे निंबाळकर यांच्या शिवसेना शिंदे गटातील पक्षप्रवेशानंतर धाराशिव जिल्ह्यातील सर्वच राजकीय समीकरणे बदलली आहेत.

Follow Us
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात अवमान याचिका! सुनावणी सुरु