AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर ओमराजे निंबाळकर यांचे मोठे विधान, आजचा दिवस माझ्यासाठी..

शिवसेना ठाकरे गटात मोठी फुट पडली आहे. थेट 6 खासदारांनी मोठी बंडखोरी केली. त्यांनी थेट शिवसेना शिंदे गटाचा हात पकडला. ओमराजे निंबाळकर यांचाही बंडखोरी करणाऱ्या 6 खासदारांमध्ये समावेश आहे. नुकताच आता ओमराजे निंबाळकर यांनी मोठे विधान केले.

उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर ओमराजे निंबाळकर यांचे मोठे विधान, आजचा दिवस माझ्यासाठी..
MP Omraje Nimbalkar
| Updated on: Jun 20, 2026 | 8:32 AM
Share

शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार शिवसेना शिंदे गटाच्या गळ्याला लागले. या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना स्वतंत्र गट स्थापनेबद्दलचे पत्र दिले. दोन्ही शिवसेनेचे वर्धापन दिनाचे मेळावे पार पडले. यावेळी जोरदार टीका करण्यात आली. 6 खासदारांनंतर शिवसेना शिंदे गटात ठाकरे गटाचे काही आमदारही दाखल होणार असल्याचा दावा शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्याने केला. ठाकरे 6 खासदार पक्षाने व्हिप जारी करूनही बैठकीस दाखल झाले नाही. मोठी फूट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत पडलीये.  उद्धव ठाकरेंना दुसऱ्यांदा मोठा धक्का एकनाथ शिंदे यांनी दिला. ठाकरे गटाकडून या खासदारांना कारणे दाखवा नोटीसही पाठवण्यात आली. बंडखोरी करणाऱ्या 6 खासदारांमध्ये ओमराजे निंबाळकर यांच्याही नावाचा समावेश आहे. ओमराजे निंबाळकर यांच्या बंडखोरीनंतर धाराशिवमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठी सुरंग लागली. शिवसेना ठाकरे गट नक्की का सोडला, याबाबत स्पष्ट बोलताना ओमराजे निंबाळकर दिसले.

शिवसेना ठाकरे गट सोडल्यानंतर ओमराजे निंबाळकर यांची सोशल मीडियावरील फॉलोइंग कमी होताना दिसत आहे. पवन राजे हत्याकांडाची आज सुनावणी आहे. निकाल जाहीर होण्याची आज शक्यता आहे. 20 वर्षांनंतर पवनराजे दुहेरी हत्याकांडाचा आज निकाल लागू शकतो. डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. पवन राजे निंबाळकर हे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे वडील होते.

यादरम्यानच नुकताच बोलताना ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले की, माझ्या कुटुंबाने गेली 20 वर्ष आणि 17 दिवस जो अविरत संघर्ष केला, न्यायाच्या भूमिकेतून.. माझे कुटुंब असेल काझींचे कुटुंब असेल. ज्याप्रकारे पवनराजे निंबाळकर यांची हत्या झाली, त्यांचे चालक काझी यांचीही मला वाटते की, रक्ताच्या नात्याला काळींबा फासणारी ही घटना होती. तेव्हापासून आजपर्यंत आम्ही न्यायाच्या प्रतिक्षेत आहोत.

20 वर्षाच्या प्रर्दीघ लढ्यानंतर आज निर्णयासाठी कोर्टाने तारीख राखीव केलेली आहे. अपेक्षा इतकीच आहे की, न्यायदेवतेच्या माध्यमातून न्याय व्हावा. यादरम्यान राजकीय भूमिकेबद्दल त्यांना विचारण्यात आले असता ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले की, आज मी याबद्दल काहीच बोलणार नाही.. आज माझ्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा दिवस आहे आणि आम्ही सर्वजण त्याच्या प्रतिक्षेत आहोत. ओमराजे निंबाळकर मुंबईकडे रवाना झाले आहेत.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी