NCP Merger Talks : शरद पवार गटातून तुम्हाला कोणाचे फोन आले? पार्थ पवारांनी बोलावलेल्या तातडीच्या आमदारांच्या बैठकीतली Inside Story

NCP Merger Talks : पार्थ पवार आज पुणे जिल्ह्यातील आमदारांची मतं जाणून घेणार आहेत. टप्याटप्याने इतर आमदारांशी पार्थ पवार चर्चा करणार आहेत. दरम्यान पार्थ पवार स्वत: दोनदा शरद पवार यांना भेटले आहेत.

NCP Merger Talks : शरद पवार गटातून तुम्हाला  कोणाचे फोन आले? पार्थ पवारांनी बोलावलेल्या तातडीच्या आमदारांच्या बैठकीतली Inside Story
Parth Pawar-Sharad Pawar
| Updated on: Nov 13, 2026 | 11:41 AM

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडामोडींना वेग आला आहे. आधी मुंबईतील देवगिरी बंगल्यावर आता पुण्यात बैठकींचा सिलसिला सुरु आहे. खासदार पार्थ पवार हे पुणे जिल्ह्यातील आमदारांची बैठक घेत आहेत. काही वेळापूर्वी ही बैठक सुरु झाली आहे. विलिनीकरणासंदर्भात पार्थ पवार हे मतं जाणून घेत आहेत. काही आमदारांना शरद पवार गटातून फोन आला होता. अजित पवार गटाकडूनही काही आमदारांना फोन गेले आहेत. शरद पवार गटातून तुम्हाला कोणाचे फोन आले होते? हे पार्थ पवार जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री दत्तात्रय भरणे, शिरूर हवेलीचे आमदार माऊली कटके आणि भोरचे आमदार शंकर मांडेकर बैठकीला उपस्थित आहेत.

पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा बँक अध्यक्ष सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत. पार्थ पवार हे प्रमुख पदाधिकारी, आमदारांची मत जाणून घेत आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बैठकीचा सिलसिला सुरु आहे. शरद पवार यांच्या सिल्वर ओकवर सुद्धा प्रमुख नेत्यांच्या बैठका सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काहीतरी मोठ घडत आहे. काही दिवसांपूर्वी सुनील तटकरे यांनी बारामतीला जाऊन सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. त्यानंतर तटकरे मुंबईला येऊन देवेंद्र फडणवीसांना भेटले. सुनेत्र पवार यांचा काहीतरी निरोप घेऊन ते फडणवीसांना भेटले असावेत असा अंदाज आहे.

Loading...

विलिनीकरणाला कोणाचा विरोध?

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विलिनीकरणावर स्पष्ट भूमिका मांडत नाहीयत. पण विलिनीकरणावर दोन्ही बाजूकडून काहीतरी सुरु आहे. दोन्ही राष्ट्रवादीमधील काही नेते विलिनीकरणाबाबत सकारात्मक असल्याचं समजतय. पण अजित पवार राष्ट्रवादीमधील काही प्रमुख नेत्यांचा विरोध असल्याचं समजतय. आता पार्थ पवार आपल्या पक्षातील आमदारांची मत जाणून घेत आहेत. बैठकीचा तपशील थोड्याचवेळात बाहेर येईल. पण विलिनीकरण हा मुद्दा आहेच.

या सर्व चर्चांनी जोर पकडला

दिवाळीत शरद पवार रुग्णालयात असताना अजित पवार गटाचे प्रफुल पटेल त्यांना भेटले. त्यावेळी शरद पवार आणि प्रफुल पटेल यांच्या चर्चेतील एक वाक्य बाहेर आलं, त्यानंतर या सर्व चर्चांनी जोर पकडला.

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us