AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदे गटाचे सर्व आमदार लवकरच…कोर्टातील सुनावणी होताच राऊतांचं मोठं विधान; काहीतरी मोठं घडणार?

सर्वोच्च न्यायालयात आज शिवसेना पक्ष आणि पक्षाच्या चिन्हाची मालकी याबाबत महत्त्वाची सुनावणी पार पडली. उद्धव ठाकरे यांच्या पक्षातर्फे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली.

शिंदे गटाचे सर्व आमदार लवकरच...कोर्टातील सुनावणी होताच राऊतांचं मोठं विधान; काहीतरी मोठं घडणार?
sanjay raut and eknath shindeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 05, 2026 | 5:16 PM
Share

Shivsena Court Hearing : शिवसेना पक्ष नेमका कोणाचा? तसेच शिवसेना पक्षाचे निवडणूक चिन्ह कोणाचे? याबाबत आज (5 ऑगस्ट) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची बाजू ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी मांडली. यावेळी सिब्बल यांनी पक्षाची घटना आणि या घटनेत असलेल्या तरतुदींचा आधार घेत जोरदार युक्तिवाद केला. यावेळी नियमानुसार शिंदे यांचे सर्वच आमदार अपात्र ठरतील, असा युक्तीवाद केला. आता पुन्हा एकदा 6 ऑगस्ट रोजी या प्रकरणावर न्यायालयात सुनावणी होईल. दरम्यान, आजची सुनावणी पार पडल्यानंतर ठाकरे यांच्या पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. शिंदेंचे सर्व आमदार अपात्र ठरतील, असे ते म्हणाले.

 संजय राऊत काय म्हणाले?

त्यांची प्रत्येक कृती बेकायदेशीर आहे. भारतीय संविधानातील दहाव्या शेड्यूल तसेच परिच्छेद दोननुसार शिंदे यांच्यासोबत गेलेले सर्व आमदार हे अपात्र ठरतील. शिवसेनेचे चिन्ह आणि मूळ शिवसेना ही त्यांच्याकडे अत्यंत बेकायदेशीरपणे सोपवण्यात आलेली नाही. कोणताही नियम, कोणताही कायदा, संविधानातील कोणत्याही तरतुदीनुसार शिवसेने सोपवण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. हेच आज कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयापुढे मांडले आहे.

ठाकरेंच्या वकिलाने न्यायालयापुढे काय बाजू मांडली?

सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनीदेखील माध्यमांना प्रतिक्रिया दिली. आज आमच्याकडून राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष यातील फरक अधोरेखित करण्यात आला. कोणतेही पाऊल उचलताना किंवा कुठलीही नेमणूक करताना पक्षाने ठरवलेल्या चौकटीचा विचार करावा लागतो. अशा निर्णयांना सर्वांची मान्यता असते. या सर्व गोष्टींचे उल्लंघन करून कशाप्रकारे सादर करण्यात आल्या याबाबत आज आम्ही आमची बाजू मांडली. आम्ही सुभाष देसाई केसचे दाखलेही दिले, कोर्टानेही त्या गोष्टी मान्य केल्या की काही गोष्टींचे उल्लंघन झालेले आहे, असे अनिल देसाई यांनी सांगितले.

शिंदे गटाचे वकीलही मांडणार बाजू

दरम्यान, या प्रकरणाची सुनावणी 6 ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. त्यामुळे कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादानंतर शिंदे गटाचे वकील आपली बाजू मांडणार आहेत. त्यामुळे या प्रकरणात निकाल काय लागणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Follow Us
सिद्धार्थ गोरे प्रकरणात जिंदाल कंपनी अडचणीत
Nashik | सिद्धार्थ गोरे प्रकरणात जिंदाल कंपनी अडचणीत, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे प्रशासनाचे आदेश
धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांना ताब्यात घेतल्याने गोंधळ; कैलास पाटील...
धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांना ताब्यात घेतल्याने गोंधळ, ठाकरेंचे आमदार थेट...
मराठवाड्याच्या रखडलेल्या प्रकल्पांवरून ठाकरे सेना आक्रमक
Uddhav Thackeray : मराठवाड्याच्या रखडलेल्या प्रकल्पांवरून ठाकरे सेना आक्रमक, संभाजीनगरात आंदोलन
धाराशिवमध्ये अजब कारभार; जिल्ह्यातील विकास समितीच्या बैठकीत...
धाराशिवमध्ये अजब कारभार; जिल्ह्यातील विकास समितीच्या बैठकीत... नेमकं काय घडतंय?
पीक वाचवायचं तरी कसं? शेतकरी संकटात, खतांचे भाव तर गगनाला भिडले
Bhandara | पीक वाचवायचं तरी कसं? भंडाऱ्यात शेतकरी संकटात, खतांचे भाव तर गगनाला भिडले
लालबागच्या राजाच्या इथे बनावट आयडी कार्डसह तरुणाला पकडलं
LalBaug Raja : लालबागच्या राजाच्या इथे बनावट आयडी कार्डसह तरुणाला कार्यकर्त्यांनी पकडलं
मोदींच्या कार्याची उंची हिमालयासारखी, समर्पण अरबी समुद्राएवढं!
Eknath Shinde | मोदींच्या कार्याची उंची हिमालयासारखी, समर्पण अरबी समुद्राएवढं! पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री शिंदेंनी केलं कौतुक
मुंबईत कोणी भीक घालणार नाही म्हणून उपोषण मागे घेतलं
Laxman Hake | मुंबईत कोणी भीक घालणार नाही म्हणून उपोषण मागे घेतलं, लक्ष्मण हाके यांची जरांगेवर टीका
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी मोठी घोषणा!
Devendra Fadnavis | मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी मोठी घोषणा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला मोठा प्लॅन, Video बघाच
58 लाख कुणबी नोंदींपैकी फक्त... तायवाडेंचा मोठा दावा
Babanrao Taywade | 58 लाख कुणबी नोंदींपैकी फक्त... बबनराव तायवाडेंचा मोठा दावा, नेमकं काय म्हणाले?