MPSC चा सर्वात मोठा निर्णय! ही महत्त्वाची परीक्षा पुढे ढकलली, आता या तारखेला होणार परीक्षा!

एमपीएससी आयोगाच आणखी परिपत्रक रिपोर्टर : प्रदीप कापसे गट क २०२६ ची संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय २५ ऑक्टोबर ला होणार होती परीक्षा तीन महिने पुढे ढकलण्याचा निर्णय पुढील परीक्षा आता ३ जानेवारी २०२७ ला होणार परीक्षा

MPSC चा सर्वात मोठा निर्णय! ही महत्त्वाची परीक्षा पुढे ढकलली, आता या तारखेला होणार परीक्षा!
MPSC POSTPONE EXAM
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 09, 2026 | 10:21 PM

प्रदीप कापसे, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी : राज्यात सध्या स्पर्धा परीक्षेच्या मुद्द्यावरून विद्यार्थी चांगलेच संतापले आहेत. स्पर्धा परीक्षेत होणारा गोंधळ, परीक्षेच्या आयोजनातून समोर येणारा ढिसाळ कारभार या सर्व प्रकारामुळे राज्यभरातील विद्यार्थी आंदोलन करत आहेत. गेल्या काही दिवसांत परीक्षेतील कथिक पेपरफुटीची प्रकरणं समोर आल्यानेही एमपीएससीच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, एकीकडे विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू झालेले असताना आता दुसरीकडे एमपीएससीने सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. एमपीएससीने महत्त्वाची परीक्षा पुढे ढकलली आहे.

एमपीएससीने कोणती परीक्षा पुढे ढकलली?

मिळालेल्या माहितीनुसार एमपीएससीने एक परीपत्रक जारी केले आहे. या परीपत्रकानुसार गट क 2026 ची संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. नियोजित वेळापत्रकानुसार ही परीक्षा 25 ऑक्टोबर रोजी होणार होती. परंतु ही परीक्षा तीन महिने पुढे ढकलण्यात आली आहे. नव्या परीपत्रकानुसार ही परीक्षा 3 जानेवारी 2027 रोजी होणार आहे.

सध्या राज्यात नेमकं काय चालू आहे?

स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी पुण्यात आक्रमक झाले. त्यांनी एकत्र येऊन एमपीएससीच्या कारभाराविरोधात आंदोलन केले. या आंदोलनात आमदार रोहित पवार यांनीदेखील सहभाग नोंदवला. त्यांनी विद्यमान एमपीएससी अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला. त्यांनी काहीही झालं तरी एमपीएससीच्या विद्यमान अध्यक्षांना हटवावे. त्याऐवजी आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यासारख्या तडफदार अधिकाऱ्याला नियुक्त करावे, अशी मागणी रोहित पवार यांनी केली. विरोधकांनीही एमपीएससी पेपरफुटीचा मुद्दा लावून धरला. त्यामुळे सरकारलाही विरोधकांची, विद्यार्थ्यांची भूमिका गृहित धरून पेपरफुटी होणार नाही, यासाठी कठोर पावलं उचलली जातील, अशी भूमिका घ्यावी लागली.

पेपरफुटीविरोधात योग्य पावलं उचलली जातील- सरकार

भविष्यात कधीही पेपरफुटी होणार नाही, भरती प्रक्रियेत पारदर्शकता राहील यासाठी योग्य पावलं उचलली जातील, असं सरकारने सांगितलं आहे. असे असतानाच आता एमपीएससीने गट क 2026 ची संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली आहे. त्यामुळे आता ही परीक्षा साधारण तीन महिन्यांनी होणार आहे. तसे एमपीएससीने सांगितले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us