Mpsc result : PSI पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर, मुख्य परीक्षा होणार 1 जानेवारी 2022 ला

| Updated on: Dec 03, 2021 | 10:07 PM

एमपीएससी दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब 2020 PSI पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.  4 सप्टेंबर 2021 रोजी घेण्यात संयुक्त पूर्व परीक्षा आली होती. त्या परीक्षेच्या निकालाची एमपीएससी आयोगानं संकेतस्थळावर यादी जाहीर केली आहे.

Mpsc result : PSI पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर, मुख्य परीक्षा होणार 1 जानेवारी 2022 ला
महाराष्ट्र लोकसेवा आयोग
Follow us on

मुंबई : एसपीएससी परीक्षेच्या पूर्व परीक्षांच्या निकालाची सर्व विद्यार्थ्यांना प्रतीक्षा लागली होती. मात्र आता ती प्रतीक्षा संपली आहे. एसपीएससीने आपल्या संकेतस्थळावर निकाल जाहीर केले आहेत, त्यामुळे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. एमपीएससीचे विद्यार्थी अनेक दिवस या दिवसाची वाट पाहत असतात, त्यामागे त्यांची मोठी मेहनत असते, कोरोनाकाळात अनेकदा परीक्षा लांबल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते, मात्र या निकालाने विद्यार्थ्यांची मानसिकता बदलण्यात फार मोठी मदत होणार आहे.

PSI पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर

एमपीएससी दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब 2020 PSI पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.  4 सप्टेंबर 2021 रोजी घेण्यात संयुक्त पूर्व परीक्षा आली होती. त्या परीक्षेच्या निकालाची एमपीएससी आयोगानं संकेतस्थळावर यादी जाहीर केली आहे. त्यामुळे पूर्व परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी मुख्य परीक्षा देऊ शकणार आहेत, या विद्यार्थ्यांचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

मुख्य परीक्षा होणार 1 जानेवारी 2022 ला

तसेच विद्यार्थ्यांना आणखी एक आनंदाची बातमी मिळाली आहे, ती म्हणजे एमपीएससी मुख्य परीक्षेची तारीखही जाहीर झाली आहे. पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना 1 जानेवारी 2020 ला मुख्य परीक्षा देता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नववर्षाच्या तोंडावर मोठी गूडन्यूज मिळाली आहे. पूर्व परीक्षेचा निकाल लागल्यानं विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. तसेच मुख्य परीक्षेच्याही तारखा आल्यानं विद्यार्थ्यांना त्या वेळेचे नियोजन करून अभ्यास करता येणार आहे. कोरोनाकाळात अनेकदा परीक्षा रद्द झाल्याचं पहायला मिळालं. त्यानंतर पुण्यात विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केलं होतं. राज्य सरकारने यावर तोडगा काढत पूर्व परीक्षेच्या तारखा पुन्हा जाहीर करून परीक्षा घेतल्या होत्या.

Zodiac | सावधान! 2022 या वर्षात 6 राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात संकट येणार, तुमची रास यामध्ये आहे का?

लग्नाच्या मंडपात नवरदेवाकडून लस घेण्याचं आवाहन, वऱ्हाडी म्हणाले ‘कबूल है,’ बुलडाण्यातील अनोख्या लग्नाची चर्चा

‘पुण्याचं पाणी पळवतील त्यांना पुणेकर पाणी पाजल्याशिवाय राहणार नाहीत’, देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांवर निशाणा