विद्यार्थ्यांवर मालकी हक्क दाखवू नका,ती काही गुरढोरे नाहीत, वकील गुणरत्न सदावर्ते यांची टीका
आंदोलक मुलांनी हे लक्षात घ्या, आपण येथे जेवायला आलेलो नाही तर अधिकारी व्हायला आलो आहोत. अध्यक्षांना हटवण्याचा अधिकार राज्य सरकारला आहेत का? याचाही विचार करावा असेही सदावर्ते यावेळी म्हणाले.

आज विद्यार्थ्यांच्या ज्या भावना परीक्षेबाबत आहेत, त्याच माझ्या आहेत. त्याचं बरोबर आहे, परीक्षेवर विश्वास राहिला पाहिजे, विद्यार्थी गुरेढोर नाहीत कोणाच्याही मागे जायला असे वक्तव्य वकील गुणरत्न सदावर्ते यांनी पुण्यात आंदोलक एमपीएससी विद्यार्थ्यांना भेटल्यानंतर केले आहे. आपण विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी आलो आहे. ज्यांना कळते त्यांनी लोकसेवा आयोगावर बोलावे असे माझे स्पष्ट मत आहे. सगळे आंदोलक माझेच आहेत. विद्यार्थी चिखलाच्या गोळ्यासारख असतो. कोणीही येऊन बोलून चालले आहे, ज्यांना काही कळत नाही असे लोक बोलत आहेत अशी टीका सदावर्ते यांनी केली आहे.
वकील गुणरत्न सदावर्ते यावेळी म्हणाले की ही काय परिस्थिती करून ठेवली आहे. सत्तेतील आमदार आणि मंत्री शपथ घेतात. माझ्या मते सामाजिक कार्यकर्त्यांना विचारायला हवं, हे राजकारणी इकडे खातात, तिकडे खातात. आता आंदोलन कलंकित झाले आहे. मी एस.एम.जोशी पुलावर जाणार आणि त्यांनाही बोलणार आहे. होऊन जाऊ दे बारामतीच्या एसटी स्टँडवर येऊन बसून चर्चा करूयात.
तुमचे दळभद्री राजकारण करू नका
मला एकच सांगायचे आहे की कोणी महाराष्ट्रातील एमपीएससी विद्यार्थ्यांवर मालकी हक्क दाखवू नका. एमपीएससी विद्यार्थी काही गुरढोरे नाहीत. कोणाच्याही मागे यायला. विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांकडे गेले होते, चर्चा झाली, कॉमन ड्राफ्टवर सह्या झाल्या, सगळे एकमत झाले, एमपीएससी अध्यक्षांच्या चौकशीचे मान्य केले. राज्यातील सगळी मुले एमपीएससीचे विद्यार्थी आहेत. त्यांच्यावर तुमचे दळभद्री राजकारण करू नका असेही सदावर्ते यावेळी म्हणाले.
संविधान ज्यांना कळते, त्यांना कळते. आज पण अधिकारी आम्हाला घाबरतात. शेवटच्या काळात खूप थोडे दिवस अजित पवार माझे मित्र झाले होते. अजित पवार यांची शपथ खाऊन सांगतो एक बोट आपल्याकडे दाखवता, तेव्हा चार बोटे आपल्याकडे येतात. मागील काही काळ राहिलेले कर्णिक सह एमपीएससी अध्यक्ष कोण होते ? कुठल्याही अपप्रवृत्ती विरोधात मी बोलतोच. पुस्तिका कोणाच्या काळात बदलल्या आहेत. आयोगाच्या विषय पद्धतीवर चर्चा का होत नाही?, इसको हटाव, उसको हटाव हेच सुरू आहे अशी टीका यावेळी सदावर्ते यांनी यावेळी केली.
आपण येथे जेवायला आलेलो नाही तर…
रोहित पवार यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नकटं नाक घेऊन काल जे लेकरू येऊन गेले, त्याला विचार तो काळ काय होता ? आयोगाच्या परीक्षा देताना खूप जबाबदारी आहे, निवडणूकी सारखे नाते, पोरांचे परीक्षेशी नाही. वेळेवर परीक्षा होऊ नये अशी परिस्थित कोणी आणली ? सत्य पारस्थिती असेल तर आंदोलन करायला हवं. सगळ्या आंदोलक मुलांनी हे लक्षात घ्यावे की आपण येथे जेवायला आलेलो नाही तर अधिकारी व्हायला आलो आहोत. राज्य सरकारला यात काही अधिकार आहेत का? याचाही विचार करावा असेही सदावर्ते यावेळी म्हणाले.