मुंबईत भयंकर अनर्थ! मोठं झाड स्कुल बसवर कोसळलं, एका चिमुकल्याचा मृत्यू, 10 मुलं गंभीर, नेमकं काय घडलं?

बसमध्ये एकूण 13 विद्यार्थी बसलेले होते. झाड पडल्याने ते सगळेच बसमध्ये अडकले यातील काही विद्यार्थी हे गंभीर जखमी असल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. झाड मोठे असल्याने त्याला उचलणे शक्य नव्हते, असे सांगण्यात आले.

मुंबईत भयंकर अनर्थ! मोठं झाड स्कुल बसवर कोसळलं, एका चिमुकल्याचा मृत्यू, 10 मुलं गंभीर, नेमकं काय घडलं?
mumbai chembur school bus accident
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 30, 2026 | 5:09 PM

 Mumbai Chembur School Bus Accident : मुंबईतील चेंबूर भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. एक भले मोठे झाड स्कुल बसवर पडल्याने तब्बल 10 विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. यातील एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची दुख:द माहिती समोर येत आहे. दरम्यान ही घनटा समोर आल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. जखमी विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य करण्यात आले. दरम्यान, आता ही घटना नेमकी घडली तरी कशी? असा प्रश्न उपस्थित केला जातोय?

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील चेंबूर या भागात भल्या मोठ्या झाडाखाली पिवळ्या रंगाची एक स्कुल बस थांबलेली होती. या स्कुलबसमध्ये एकूण 13 विद्यार्थी बसलेले होते. पावसाच्या पाण्यामुळे काही ठिकाणी पाणी होते. बस ज्या ठिकाणी थांबलेली होती, त्याच्याच बाजूला एक महाकाय असे झाड होते. हे झाड खूप वर्षांपूर्वीचे असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पावसाच्या पाण्यामुळे आणि वाऱ्यामुळे हे झाड कोसळून थेट स्कुलबसवर पडले. कोणतीही कल्पना नसताना अचानकपणे हा अपघात घडला.

13 विद्यार्थ्यांपैकी 10 जणांवर उपचार

बसमध्ये एकूण 13 विद्यार्थी बसलेले होते. झाड पडल्याने ते सगळेच बसमध्ये अडकले यातील काही विद्यार्थी हे गंभीर जखमी असल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. झाड मोठे असल्याने त्याला उचलणे शक्य नव्हते. त्यामुळे झाडाला कापून बसमधील विद्यार्थ्यांची सुटका करण्यात आली. एकूण 13 विद्यार्थ्यांपैकी 10 जणांवर उपचार केले जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. तशी माहिती शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांनी दिली आहे.

उद्यान अधिक्षकावर कारवाई करा

दरम्यान, ही घटना घडल्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे. विकास हवा आहे. ही घटना ज्या भागात घडली, त्या भागातील उद्यान अधिक्षकावर कारवाई केली पाहिजे. कारण झाडांचे भार कमी करणे, झाडांचे संरक्षण करणे, झाड मुळासहित उखडून पडू नये यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. पाऊस पडण्याआधी मार्च-एप्रिल महिन्यात या गोष्टी केल्या पाहिजेत. याबाबतची खबरदारी घेतली जात नाही, म्हणूनच असे अपघात होतात, अशी मागणी मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केली.

Follow Us