महाराष्ट्रभर आंदोलनं, जाळपोळ…; मुख्यमंत्री शिंदे अॅक्शन मोडमध्ये, रात्री न झोपता परिस्थितीचा आढावा

CM Eknath Shinde Review Maharashtra Violence Maratha Reservation : राज्यात सध्या ठिकठिकाणी मराठा आंदोलक आंदोलन करत आहेत. ठिकठिकाणी रास्तारोको केला जात आहे. जाळपोळ झाल्याच्या घटना समोर येत आहेत. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सगळ्यावर लक्ष ठेवून आहेत.

महाराष्ट्रभर आंदोलनं, जाळपोळ...; मुख्यमंत्री शिंदे अॅक्शन मोडमध्ये, रात्री न झोपता परिस्थितीचा आढावा
| Updated on: Oct 31, 2023 | 3:07 PM

गिरीश गायकवाड, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, मुंबई | 31 2023 : आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. राज्यभर आंदोलनं होत आहेत. बीडमध्ये आमदारांची घरं जाळली गेली. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या सगळ्या घटनांवर लक्ष ठेवून आहेत. ते या घटनांचा आढावा घेत आहेत. तसंच या पार्श्वभूमीवर प्रशासनाला अलर्ट राहण्याच्याही सूचना त्यांनी दिल्या आहेत. काल रात्रभर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झोपले नाहीत. राज्यातील संपूर्ण परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातली राजकीय परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला. तसंच कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती घेतली.

राज्यात ठिकठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पुन्हा एकदा ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. आज मंत्रालयामध्ये कॅबिनेट बैठकीनंतर मुख्यमंत्री महत्त्वाच्या सूचना करणार आहेत. राज्य सरकारचं एक शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला जाण्याची शक्यता आहे. यात तिन्ही पक्षाचे दोन दोन नेते उपस्थित राहणार राहणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

शिंदे यांच्या घराबाहेरच्या सुरक्षेत वाढ

मराठा आरक्षणासाठी सुरु असलेलं आंदोलन आता अधिक तीव्र झालं आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढण्यात आला आहे. वर्षा निवासस्थानाकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महालक्ष्मी रोड ते मलबार हिल या भागात बॅरिगेटिंग करण्यात आलं आहे. वर्षा निवासस्थानी जाणाऱ्या मार्गावर दोन ते तीन ठिकाणी पोलिसांनी बॅरिगेट लावण्यात आला आहे.

यवतमाळमध्ये ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांवर चप्पल भिरकवण्यात आली होती. याच अनुषंगाने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलीस सज्ज झाली आहे. तसंच मुंबई पोलिसांनी मरबाड हिल परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात आहे. तर वर्षा निवासस्थानी येणाऱ्या सर्व मार्गावर मोठ्या प्रमाणात बॅरिगेट लावण्यात आलेत. पोलिसांनी बंदोबस्त लावत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.