मराठा आरक्षणासाठी मंत्रिमंडळाचा सर्वात मोठा निर्णय, इम्पेरिकल डेटा गोळा करणार

मराठा आरक्षणाबाबत सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राज्यात मराठा आरक्षणावरुन वातावरण तापताना दिसत आहे. मराठा आंदोलक आक्रमक होताना दिसत आहेत. तर दुसरीकडे राज्य मंत्रिमंळाने मंत्रिमंडळ बैठकीत अतिशय मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

मराठा आरक्षणासाठी मंत्रिमंडळाचा सर्वात मोठा निर्णय, इम्पेरिकल डेटा गोळा करणार
Follow us
| Updated on: Oct 31, 2023 | 2:43 PM

मुंबई | 31 ऑक्टोबर 2023 : मराठा आरक्षणाबाबत सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राज्यात मराठा आरक्षणावरुन वातावरण तापताना दिसत आहे. मराठा आंदोलक आक्रमक होताना दिसत आहेत. राज्यातील काही भागांमध्ये जाळपोळच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. पण मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी या जाळपोळचं समर्थन केलेलं नाही. त्यांनी सर्वांना शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन केलं आहे. राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता सरकार दरबारी देखील हालचालींना वेग आलाय. राज्य मंत्रिमंडळाची आज तातडीने महत्त्वाची बैठक बोलावण्यात आलीय. या बैठकीत मराठा आरक्षणासाठी दोन अतिशय मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.

मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमली आहे. ही समिती मराठवाड्यातील मराठ्यांची कुणबी मराठा प्रमाणपत्रांची जुनी नोंदी तपासत आहे. ही समिती हैदराबादसह मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जावून कागदपत्रांची पडताळणी करत आहे. या समितीने आतापर्यंत कोट्यवधी कागदपत्रांची छाननी केली आहे. या कागदपत्रांमध्ये समितीला 11 हजार पेक्षा जास्त कुणबी मराठा नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांच्या वंशांना कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्यास आजच्या मंत्रिमंडळात निर्णय झाला.

मराठवाड्यातील निझामकालीन आणि इतर उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मराठा -कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रांसंदर्भात कार्यवाही निश्चित करणाऱ्या न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा प्रथम अहवाल स्वीकृत करण्यात आलाय. कुणबी नोंदी असलेल्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरू करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

नव्याने इम्पेरिकल डेटा गोळा करणार

याशिवाय दुसरा मोठा महत्त्वाचा निर्णय म्हणजे मराठा समाजाचे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी मागासवर्ग आयोग नव्याने इम्पेरिकल डेटा गोळा करणार आहे. न्या. दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली न्या. मारोती गायकवाड, न्या संदीप शिंदे यांचे सल्लागार मंडळ मराठा आरक्षणाबाबत कायदेशीर प्रकरणांत शासनाला मार्गदर्शन करणार आहेत.

राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील इतर निर्णय

  • नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार २ हेक्टर ऐवजी ३ हेक्टर मर्यादेत मदत करणार. (मदत व पुनर्वसन विभाग)
  • चेंबूरला अनुसूचित जातीच्या मुला-मुलींसाठी आयटीआय कोर्स सुरु करणार (कौशल्य विकास)
  • नांदगाव येथील पीएम मित्रा पार्क उभारणीसाठी मुद्रांक नोंदणी शुल्क १०० टक्के सूट (महसूल व वन)
  • चिटफंड न्यायालयीन प्रकरणांना वेग येणार. कायद्यात सुधारणा करणार

"मला भिती वाटते माझं वक्तव्य मोठं...ठाकरेंना संपवून शिंदेंना आणलं आता"
'...तर पक्षातून हकालपट्टी', अजितदादांचा आपल्याच नेत्यांना सूचक इशारा
'...तर पक्षातून हकालपट्टी', अजितदादांचा आपल्याच नेत्यांना सूचक इशारा.
बीडचं पालकमंत्री दादांकडे, कोणत्या कारणानं पालकमंत्रीपद हातून निसटलं?
बीडचं पालकमंत्री दादांकडे, कोणत्या कारणानं पालकमंत्रीपद हातून निसटलं?.
'राणेंनी बोलू नये', मराठा आरक्षणावरून नारायण राणे-जरांगेंमध्ये जुंपली
'राणेंनी बोलू नये', मराठा आरक्षणावरून नारायण राणे-जरांगेंमध्ये जुंपली.
धनंजय मुंडे यांचं सुरेश धस अन् मनोज जरांगे पाटलांना खुलं आव्हान
धनंजय मुंडे यांचं सुरेश धस अन् मनोज जरांगे पाटलांना खुलं आव्हान.
पालकमंत्रीपदावरून शिवसेना नाराज? एकनाथ शिंदे पुन्हा दरे गावी?
पालकमंत्रीपदावरून शिवसेना नाराज? एकनाथ शिंदे पुन्हा दरे गावी?.
G-Pay नं पेमेंट अन् सुगावा, मध्यरात्री सैफच्या आरोपीला ठोकल्या बेड्या
G-Pay नं पेमेंट अन् सुगावा, मध्यरात्री सैफच्या आरोपीला ठोकल्या बेड्या.
पहाटेचा शपथविधी एक षडयंत्र, धनंजय मुंडे यांचा नेमका कोणाकडे इशारा?
पहाटेचा शपथविधी एक षडयंत्र, धनंजय मुंडे यांचा नेमका कोणाकडे इशारा?.
प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात अग्नितांडव, आगीत 100 हून तंबू जळून खाक
प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात अग्नितांडव, आगीत 100 हून तंबू जळून खाक.
'मीच दादांना पालकमंत्रीपद घेण्याची विनंती केली, कारण..' - धनंजयय मुंडे
'मीच दादांना पालकमंत्रीपद घेण्याची विनंती केली, कारण..' - धनंजयय मुंडे.