
उन्हाळा असो की पावसाळा, सतत घामाच्या धारांनी चिंब होणाऱ्या मुंबीकरांना थंडीचा अुनभव मिळणे विरळाच. पण नोव्हेंबर महीना संपत येतानाच एक अपवादात्मक दिवस आला. गेल्या आवड्यात मुंबईकरांना गारव्याची सुखद अनुभूती मिळाली. गेल्या 13 वर्षांतील मुंबईतील सर्व थंड सकाळ नोंदवण्यात आली. मुबईने १३ वर्षांतील नोव्हेंबरमधील सर्वात थंड सकाळ अनुभवली. सांताक्रूझ वेधशाळेत किमान तापमान 15.7 सेल्सियस नोंदवले गेले. एकाच दिवसात 6.1 °C ची मोठी घसरण (शनिवारी २१.८°C होते). झाली. नोव्हेंबर 2012 किमान तापमान 14.6°C इतके होते.
मुंबईच्या तापमानात घट
मुंबईच्या तापमानात घट झाली असून हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात रविवारी 15.7 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. विशेष म्हणजे, शनिवारी सांताक्रूझ येथे 21.8 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले होते. म्हणजेच अवघ्या 24 तासांत किमान तापमानात 6 अंशांनी घट झाली. हवामान विभागाच्या माहितीनुसार, गेल्या अनेक वर्षांनी नोव्हेंबर महिन्यात मुंबईत 16 अंशाखाली किमान तापमानाची नोंद झाली आहे. गेले काही दिवस मुंबईतील गारठा कमी झाला होता. मागील काही दिवस मुंबईचे किमान तापमान 20 ते 23 अंश सेल्सिअस दरम्यान नोंदले जात होते. तसेच दिवसाचे तापमानही सरासरीपेक्षा अधिक होते. त्यामुळे दिवसभर उकाडा सहन करावा लागत होता. दरम्यान, हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात रविवारी 20.5 अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात 15.7 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली होती. मुंबईत गेल्या अनेक दिवसापासून तापमाणात वाढ होत होती अचानक मुंबईत काल घट झाली असून नोव्हेंबर महिन्यातील सर्वाधिक कमी तापमान काल मुंबईत नोंदवण्यात आलं.
हवेची गुणवत्ता सुधारली, मिळाली डबल गुड न्यूज
हवामान घट झाली आहेच, तरीही आणखी एक गुड न्यूज आहे. मुंबईच्या हवेचा गुणवत्ता स्तर देखील सुधारला आहे . मुंबईचा आज AQI 109 असून हा AQI गेल्या अनेक महिन्यांपापेक्षा खूप सुधारला आहे. गेल्या काही दिवसांत प्रदूषणामुळे मुंबईतील हवा खूप खराब झाली होती. मात्र आता हवेची गुणवत्ता सुधारली असून AQIही 109वर आला आहे.