मुंबईत दुपारी 12 वाजेपर्यंत किती गोविंदा जखमी झाले? काय स्थिती? आकडेवारी आली समोर

मुंबईत दहीहंडीला गालबोट लागलं आहे. अवघ्या काही तासांत अनेक गोविंदा जखमी झाले आहेत. आतापर्यंत जखमी झालेल्या गोविंदाची आकडेवारी समोर आली आहे.

मुंबईत दुपारी 12 वाजेपर्यंत किती गोविंदा जखमी झाले? काय स्थिती? आकडेवारी आली समोर
dahi handi news
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 05, 2026 | 1:45 PM

मुंबईत एकीकडे दहीहंडी उत्सव जोरदारपणे सुरू आहे. मुंबई, ठाण्यातील हजारो गोविंदा पथक दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झाले आहेत. या उत्सवादरम्यान मुंबईत उत्सवाला गालबोट लागल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईत काही तासांत अनेक गोविंदा जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुंबई महापालिका प्रशासनाने दहीहंडी उत्सवादरम्यान जखमी झालेल्या गोविंदांची रुग्णालयातील आकडेवारी जाहीर केली आहे. प्रशासनाने 5 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजेपर्यंतची माहिती दिली. विविध सरकारी आणि पालिका रुग्णालयांमध्ये एकूण २२ गोविंदा जखमी झाले आहेत. यापैकी 21 जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सध्या 1 गोविंदा रुग्णालयात उपचाराधीन आहे. मुंबईतील CT रुग्णालयात 20 जखमींना दाखल करण्यात आलं होतं. त्या सर्वांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ES रुग्णालयात 1 जखमी रुग्णाला दाखल करण्यात आलं आहे. या गोविंदाला उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर WS रुग्णालयात 1 जखमी आहे. तो सध्या उपचाराधीन आहे. दहीहंडी उत्सवादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही, अशी प्रशासनाची माहिती दिली आहे.

ठाण्यात थर कोसळून 4 जखमी 

ठाण्यातही मोठ्या प्रमाणात गोविंदा पथकांचा उत्साह पाहायला मिळत आहे. परंतु ठाण्यातही थर लावताना किरकोळ दुर्घटना घडल्या आहेत. ठाण्यात आम्ही कोपरीकर गोविंद पथक ९ थरांची सलामी देताना कोसळला. यात 4 जण गोविंदा जखमी झाले.  पहिल्यांदा सलामी देताना थर कोसळला. त्यानंतर या पथकाने पुन्हा सलामी देण्यासाठी प्रयत्न केला.

पिंपरी-चिंचवडमध्ये दहीहंडी उत्सवादरम्यान एका महिलेचा मृत्यू

पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये उत्सवादरम्यान एक लोखंडी कमान अंगावर कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. सलमा पठाण असे 45 वर्षीय महिलेचं नाव आहे. रात्री दहहंडी काढण्याचं काम सुरू होतं, त्यावेळी लोखंडी भाग हा त्यांच्या डोक्यावर पडला. त्यात गंभीर जखमी झाल्या. या दुर्घटनेत रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. सलमा यांच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.  सलमा यांच्या कुटुंबाने या प्रकरणी कोणाविरोधतही गुन्हा दाखल केला नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us