AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठा धक्का… मेहबूब शेख यांच्यावर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

एमपीएससी पेपरफुटी प्रकरणी भाजप आमदार अभिमन्यू पवार यांची बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते मेहबूब शेख यांच्यावर लातूर येथे गुन्हा दाखल झाला आहे. शेख यांनी पवार यांचे पेपरफुटीतील आरोपींशी संबंध असल्याचा आरोप केला होता. यामुळे त्यांना मोठा धक्का बसला असून, पुढील कायदेशीर भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

मोठा धक्का... मेहबूब शेख यांच्यावर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
mehboob shaikh ncpImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 05, 2026 | 1:48 PM
Share

एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात आमदार अभिमन्यू पवार यांची बदनामी करणं राष्ट्रवादीचे नेते मेहबूब शेख यांना चांगलंच भोवलं आहे. मेहबूब शेख यांच्यावर लातूर जिल्ह्यातील औसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे शेख यांना हा मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर शेख आता काय कायदेशीर पावलं उचलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, या प्रकरणात महेबूब शेख यांची अद्याप प्रतिक्रिया आलेली नाहीये.

एमपीएससी पेपर फुटी प्रकरणी आमदार अभिमन्यू पवार यांची बदनामी केल्या प्रकरणी लातूर जिल्ह्यातल्या किल्लारी नंतर आता औसा पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी शरदचंद पवार पक्षाच्या महेबुब शेख यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किल्लारीमध्ये वकील अशोक बेद्रे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर औसा येथे राष्ट्रवादीच्या महेबूब शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

एमपीएससी पेपरफुटी प्रकरणामध्ये सहा जणांना अटक करण्यात आलेली आहे. त्यानंतर यातील पॉलिटिकल कनेक्शन देखील समोर येताना दिसू लागलेली आहेत. याच अनुषंगाने सुरुवातीला आवाज उठवणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवकचे प्रदेश अध्यक्ष महेबूब शेख (Mehboob Shaikh MPSC Exam) हे सुरुवातीपासूनच या विषयावर बोलत होते. एमपीएससीचा पेपर फुटलेला आहे, मात्र एमपीएससीने हे सगळं नाकारलं होतं. त्यानंतर मेहबूब शेख यांनी मीडियाशी संवाद साधला होता. आता दूध का दूध पाणी का पाणी झालं. एमपीएससी सगळं नाकारणारच. कारण याची पाळंमुळं एमपीएससीमध्ये आहेतय. पेपर फुटीचा जो मेन डिस्ट्रीबुटर आहे, हा एमपीएससीत बसलेला आहे. आता जी अटक झाली, ती दलालाला आणि ग्राहकांना अटक झाली. पण मेन म्होरक्या आहे, याचा मास्टर माइंड हा एमपीएससीमध्ये नागासारखा ठाण मांडून बसला आहे, अशी प्रतिक्रिया शेख यांनी दिली होती.

विद्यार्थ्यांच भविष्य हे भ्रष्टाचारी लोकांच्या हातात या सरकारने दिलं. याच्यापेक्षा वाईट अवस्था कोणती? ज्या गाढवेला आता अटक झाली, त्या गाढवेच पॉलिटिकल कनेक्शन कुणासोबत आहे? भारतीय जनता पार्टीचे आमदार अभिमन्यु पवार यांचे ते निकटवर्ती आहेत. पुण्याच्या महापौरांचे देखील ते काम सांभाळत होते, ही माहिती आहे आणि त्यांच्या मार्फत हे रॅकेट पुढे गेलंय अशी देखील चर्चा जोरात आहे. कारण ज्यावेळेला त्या गाढवेच्या बायकोचं नाव मेरीटमध्ये आलं, म्हणून मी ट्वीट केलं, असं शेख यांनी म्हटलं होतं.

त्यावेळेला त्या गाढवेंचा मला फोन आला, माझ्या काही मित्रांच्या मार्फत, काही पदाधिकाऱ्यांच्या मार्फत, चार पाच वेगवेगळ्या लोकांच्या मार्फत मला फोन आले. आणि माझं नाव घेऊ नका, प्लीज, तुम्ही माझे फोटो भाजपाच्या मुख्यमंत्र्यासोबत किंवा इतर लोकांच्या सोबत आमच्या मिसेसचे फोटो ट्वीट करू नका, असं मला सांगितलं आणि मला ट्वीट डिलीट करा, ही सुरुवातीला विनंती केली. मी म्हटलं हे ट्वीट डिलीट होणार नाही, तुम्ही चौकशीला सामोरे जावा. तुम्हाला एवढी घाबरायची काय गरज आहे? ज्या मित्रांच्याकडून मला फोन आला, त्या मित्रांनी फोन ठेवल्यावर मी त्याला सांगितलं की, बॉस 100 टक्के हा त्याच्यात सहभागी आहे. कारण कर नाही, त्याला डर कशाला? तो एवढा घाबरलाय म्हणजे, दाल में कुछ काला है, असंही त्यांनी म्हटलं होतं.

मुळात हे प्रकरण दिसत तेवढं वरवर एवढं सोपं नाहीये, हा एकच पेपर फुटलेला नाही एमपीएससीचा. अनेक पेपर फुटलेत. फक्त ऋतुजा पाटील हिचा चॅट व्हायरल झाला आणि ते व्हायरल झालेला चॅट हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांनी बघितला. त्याच्यामुळे प्रकरण दाबायची सरकारची इच्छा होती. कारण या सरकारचे अनेक अभिमन्यू ह्या पेपरफुटीच्या चक्रव्यूहात अडकलेलेत आणि त्या अभिमन्यूला वाचवायचं म्हणून हा सगळा प्रयत्न त्यांचा चालू होता, असंही शेख यांनी म्हटलं होतं.

Follow Us
धमकीला भीक न घालता... शिवसेनेतील बड्या नेत्याने भर मंचावरून मोठं विधान
धमकीला भीक न घालता... शिवसेनेतील बड्या नेत्याने भर मंचावरून केलं मोठं विधान
दहीहंडीचा सांगाडा काढताना काळाचा घाला! पिंपरी-चिंचवडमध्ये लोखंडी...
मोठी बातमी! दहीहंडीचा सांगाडा काढताना काळाचा घाला, पिंपरी-चिंचवडमध्ये लोखंडी कमानीखाली दबून महिलेने गमावला जीव
उद्धव ठाकरेंच्या खांद्यावर चढून... ठाण्यातील दहीहंडी कार्यक्रमात...
उद्धव ठाकरेंच्या खांद्यावर चढून... ठाण्यातील दहीहंडी कार्यक्रमात शिंदे गटातील नेत्याचा राऊतांना खोचक टोला
ठाण्यात दहीहंडीच्या 21व्या वर्षी मोठा संकल्प; शाळेतूनच प्रो-गोविंदा...
Dahi Handi in Thane | ठाण्यात दहीहंडीच्या 21व्या वर्षी मोठा संकल्प; गोविंदांना शाळेतूनच प्रो-गोविंदा प्रशिक्षण, लक्ष्य थेट...
रविंद्र फाटकांच्या दहीहंडी कार्यक्रमात हास्यजत्रेतील कलाकारांची हजेरी
रविंद्र फाटकांच्या दहीहंडी कार्यक्रमात हास्यजत्रेतील कलाकारांची हजेरी; प्रत्येक कलाकाराचे...
कृषी सेवा परीक्षेच्या निकालावर विद्यार्थ्यांनी उपस्थित केले गंभीर प्रश
Krushi Exam | एका पेपरला एक परीक्षक, तर काहींना तीन? कृषी सेवा परीक्षेच्या निकालावर विद्यार्थ्यांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
देवेंद्र फडणवीस मुंबई, ठाण्यात 14 दहीहंडी मंडळांना देणार भेट...
देवेंद्र फडणवीस मुंबई, ठाण्यात 14 दहीहंडी मंडळांना देणार भेट; राज्यभरात गोविंदांचा उत्साह
शुभम मोटघरे यांच्या घरावर गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई! 7 आरोपी अटकेत
शुभम मोटघरे यांच्या घरावर गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई! 7 आरोपी अटकेत; मुख्य सूत्रधारावर तब्बल...
तायवाडेंचा भुजबळांना पूर्ण पाठिंबा; सरसकट कुणबी प्रमाणपत्राला विरोध
Babanrao Taywade | ओबीसींच्या हक्कांवर गदा आली तर रस्त्यावर उतरू! बबनराव तायवाडेंचा भुजबळांना पूर्ण पाठिंबा; सरसकट कुणबी प्रमाणपत्राला विरोध
सरकारचं हे दुटप्पी धोरण! ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यावर राऊतांचा संताप
Sanjay Raut | सरकारचं हे दुटप्पी धोरण! ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यावर संजय राऊतांचा संताप; बापटांच्या भूमिकेला पाठिंबा