Mumbai Mhada Lottery 2026 : दादर ते विक्रोळी! मुंबईत म्हाडाच्या लॉटरीत घरं नेमकी कुठं-कुठं? जाणून घ्या A टू Z माहिती!

म्हाडाच्या मुंबई मंडळाने 2640 घरांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर केली आहे. 30 मार्च रोजीपासून त्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. तर 15 मे रोजी या लॉटरीची सोडत जाहीर केली जाईल. त्याआधी कोणत्या भागात म्हाडाची घरे असतील, ते जाणून घ्या...

Mumbai Mhada Lottery 2026 : दादर ते विक्रोळी! मुंबईत म्हाडाच्या लॉटरीत घरं नेमकी कुठं-कुठं? जाणून घ्या A टू Z माहिती!
Mumbai Mhada Lottery 2026
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 29, 2026 | 6:53 PM

Mumbai MHADA Housing Lottery : आपलं मुंबईत घर असावं असं प्रत्येकालाच वाटतं. या स्वप्नांच्या नगरीत असे काही लोक आहेत, जे गेल्या अनेक वर्षांपासून भाड्याच्या घरात राहतात. विशेष म्हणजे हे लोक एखाद्या नव्याकोऱ्या घराच्या ईएमआय इतकेच घरभाडे अनेक वर्षांपासून भरत आहेत. मुंबईत घरांच्या गगनाला भिडलेल्या किमती लक्षात घेऊन महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) विभागीय घटक असलेल्या मुंबई मंडळातर्फे दरवर्षी अत्यंत कमी किमतीत घरांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर केली जाते. यावेळीदेखील म्हाडाच्या मुंबई मंडळाने 2640 घरांसाठी सोडत जाहीर केली आहे. येत्या 30 मार्च रोजीपासून या घरांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. याच पार्श्वभूमीवर यावेळी म्हाडाने मुंबईतील कोणकोणत्या भागातील घरांचा समावेश केला आहे, ते जाणून घेऊ या…

अर्ज कधी सुरू होणार, शेवटची तारीख काय?

म्हाडाने यावेळी आपल्या सोडतीत 2640 घरांचा समावेश केलाला आहे. या घरांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 30 मार्च रोजीपासून सुरू होईल. म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर तुम्हाला अर्ज करण्यासाठीची लिंक उपलब्ध करून दिली जाणार आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ही 30 एप्रिल 2026 असेल. तर लॉटरीमध्ये घरे कोणाकोणाला मिळाली हे 15 मे रोजी जाहीर केले जाईल. अर्ज करताना म्हाडाचे सर्व नियम जाणून घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्या भागातील घरांचा समावेश?

म्हाडाने आपल्या सोडतीत मुंबईतील वेगवेगळ्या भागातील घरांचा समावेश केला आहे. कन्नमवार नगर-विक्रोळी, पत्राचाळ सिद्धार्थ नगर-गोरेगाव, जुने मागाठाणे-बोरीवली, गोराई-बोरीवली, सुभाष नगर-चेंबुर, गांधीनगर- वांद्रे, पंतनगर-घाटकोपर, गिरगाव, वडाळा, कोपरी-पवई, माझगाव, तुंगा पवई, लोकमान्य नगर-दादर, पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा या भागातील घरांचा या सोडतीत समावेश असेल. आता कोणत्या भागात किती घरे आणि त्या घरांचा आकार किती असेल हे म्हाडा 30 मार्च रोजी जाहीर करणार आहे.

Follow Us