शिवसेनेसाठी कालचा दिवस ठरला ब्लॅक फ्रायडे… या दोन घटना चटका लावणाऱ्या

Mumbai Muncipal corporation election: मुंबईसाठी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी कालचा दिवस फार महत्त्वाचा होता. पण कालचा दिवस शिवसेनेसाठी ब्लॅक फ्रायडे ठरला आहे... दोन घटनांमुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

शिवसेनेसाठी कालचा दिवस ठरला ब्लॅक फ्रायडे... या दोन घटना चटका लावणाऱ्या
| Updated on: Jan 17, 2026 | 1:49 PM

Mumbai Muncipal corporation election: 15 जानेवारी रोजी मुंबई महानगरपालिकेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आणि 16 जानेवारी रोजी निकाल जाहिर झाले. घोषित झालेल्या निकालानुसार, राज्याप्रमाणेच मुंबईत देखील भाजप पक्ष मोठा ठरला आहे. जवळपास 25 वर्ष मुंबईवर ठाकरेंचं वर्चस्व होतं.. पण समोर आलेल्या निकालानंतर उद्धव ठाकले आणि त्यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे… अनेक वर्षानंतर उद्धव ठाकरे यांच्या हातातून मुंबई महानगरपालिका गेली आहे. या निवडणुकीत मुंबईत ठाकरे गटाला केवळ 65 जागांवर समाधान मानावे लागलं आहे. या राजकीय धक्क्यानंतर ठाकरे गटासाठी आणखी एक वाईट बातमी समोर आली..

शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार आणि ज्येष्ठ नेत्या नीला देसाई यांचं निधन झालं आहे… शुक्रवारी रात्री नीला यांचं निधन झालं आहे… शुक्रवारी रात्री 10 वाजता नीला यांनी अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, हृदयविकाराचा झटका आल्यामुळे नीला यांचं निधन झाले… उपचार मिळण्यापूर्वीच त्याचं निधन झालं… असं देखील सांगण्यात येत आहे.

Live

Municipal Election 2026

01:04 PM

Maharashtra Municipal Election Results 2026 : नितेश राणे यांनी पुन्हा ठाकरे बंधुंना डिवचलंय..

12:29 PM

Maharashtra Municipal Election Results 2026 : शर्मिला ठाकरे यांचा पराभवानंतर मोठा खुलासा...

01:45 PM

प्रखर विरोधक म्हणून काम करणार - अंकित सुनील प्रभू

12:39 PM

Mumbai Election Result 2026 : लोकांनी डोळे उघडले पाहिजेत - शर्मिला ठाकरे

07:48 PM

पिंपरी चिंचवडमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष, आकडे बहुतमापेक्षाही अधिक

07:18 PM

सोलापूरच्या निवडणुकीत पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करून भाजपचा विजय : अमोल बापू शिंदे यांची टीका

नीला देसाई यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्या शिवसेनेच्या निष्ठावंत नेत्या म्हणून ओळखल्या जात होत्या. जेव्हा महिलांची संख्या राजकारणात अत्यंत मर्यादित असताना, त्यांनी राजकारणात स्वतःची ओळख भक्कम केली. बाळासाहेब ठाकरे यांच्या विश्वासामुळे नीला यांना संधी मिळाली आणि त्यांनी संधीचं सोनं केलं. नीला देसाई या शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार होत्या… शिवय विधान परिषदेच्या सदस्य म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती.

निकालानंतर ठाकरे गटात निराशेचं वातावरण

2026 च्या महानगरपालिका निकालानंतर मुंबईवर असलेलं ठाकरे कुटुंबियांचं वर्चस्व नष्ट झालं आहे. आता मुंबईवर भाजपचा झेंडा फडकला आहे… महानगरपालिकेसाठी भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेने एकत्र लढली आणि मोठा वियज प्राप्त केला. 227 जागांपैकी 118 जागांवर महायुतीच्या उमेदवार विजयी ठरले. एकट्या भाजपने 89 जागांवर विजय मिळवला आहे, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 29 जागा राखल्या आहेत.

उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आणि मनसेचे विजयी उमेदवार

शिवसेनेने (यूबीटी) 65 जागा जिंकल्या, मनसेने 6 जागा जिंकल्या, राष्ट्रवादीने (शरद पवार) 1 जागा जिंकली, काँग्रेसने 24 जागा जिंकल्या आणि एआयएमआयएमने 8 जागा जिंकल्या. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीने 3 जागा, समाजवादी पक्षाने 2 जागा जिंकल्या आणि अपक्षांनी 2 जागा जिंकल्या.