Amit Shah: मुंबई महापालिका भाजपा आणि शिंदे गट एकत्र लढणार, शाहांकडून 150 जागांचे टार्गेट, ठाकरेंनी धोका…काय म्हणाले अमित शाहा?

| Updated on: Sep 05, 2022 | 2:40 PM

2019 च्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला धोका दिल्याचे सांगत, त्यांनी ठाकरेंवर टीका केली आहे. राजकारणात धोका सहन करु नका, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. शिवसेनेनं भाजपाच्या जागा पाडल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. अशा प्रकारे जागा पाडून शिवसेनेने भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसल्याची टीका त्यांनी केली आहे.

Amit Shah: मुंबई महापालिका भाजपा आणि शिंदे गट एकत्र लढणार, शाहांकडून 150 जागांचे टार्गेट, ठाकरेंनी धोका...काय म्हणाले अमित शाहा?
अमित शाहा यांचे टार्गेट मुंबई महापालिका
Image Credit source: ANI
Follow us on

मुंबई– मुंबई महापालिका निवडणुकातील भाजपा (BJP)आणि एकनाथ शिंदे गट (CM Eknath Shinde group)यांची शिवसेना एकत्र लढणार असल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा (Amit Shah)यांनी केली आहे. गणरायाच्या दर्शनासाठी मुंबईच्या दौऱ्यावर आलेल्या अमित शाहा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मेघदूत बंगल्यावर भाजपाच्या आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी त्यांनी मुंबई महापालिकेत 150 नगरसेवकांचे टार्गेट भाजपाला टिले आहे. यावेळी त्यांनी मुंबईत भाजपाचेच वर्चस्व राहाय़ला हवे, असा सल्लाच सर्व भाजपा नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दिला आहे. यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.

उद्धव ठाकरेंनी धोका दिला – अमित शाहा

2019 च्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला धोका दिल्याचे सांगत, त्यांनी ठाकरेंवर टीका केली आहे. राजकारणात धोका सहन करु नका, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. शिवसेनेनं भाजपाच्या जागा पाडल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. अशा प्रकारे जागा पाडून शिवसेनेने भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसल्याची टीका त्यांनी केली आहे. स्वताच्या चुकीमुळेच शिवसेना फुटली अशी टीकाही त्यांनी केली आहे. खयाली पुलाव शिजवल्याने शिवसेनेची सध्याची वाईट स्थिती झाली असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

भाजपामुळे नव्हे स्वताच्या चुकीमुळे शिवसेनेला फटका -अमित शाहा

शिवसेनेने 2014 साली केवळ दोन जागांसाठी युती तोडली असा आरोपही अमित शाहा यांनी केला आहे. शिवसेना फोडण्यास भाजपा जबाबदार असल्याच्या आरोपांनाही यावेळी अमित शाहा यांनी उत्तर दिले आहे. स्वताच्या निर्णयामुळे शिवसेना छोटा पक्ष झाल्याची टीका त्यांनी केली आहे.

अमित शाहा मुंबई दौऱ्यावर

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा हे मुंबईच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज सकाळी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. त्याचप्रमाणे आशिष शेलार यांच्या वांद्र्याच्या गणेश मंडळालाी त्यांनी भेट दिली. त्यानंतर मेघदूत बंगल्यावर त्यांनी भाजपाच्या आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. दुपारनंतर ते भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत सहभागी होणार आहेत.