
राज्यात गुरुवारी 29 महापालिका निवडणुकांसाठी मतदान पार पडलं, त्यानंतर आता आज मतमोजणी सुरू असून, अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल समोर येत आहेत, राज्यात भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर दुसऱ्या क्रमांकांवर शिवसेना शिंदे गट आहे, राज्यात काँग्रेसने देखील चांगली कामगिरी केली आहे. परंतु त्या तुलनेत राष्ट्रवादी अजित पवार गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट यांना अपेक्षीत यश मिळताना दिसून येत नाहीये. मुंबईसह, छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. तर पुण्यात भाजपनं राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांना पराभवाचा धक्का दिला आहे.
दरम्यान मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालाबाबत बोलायचं झाल्यास मुंबईमध्ये भाजपनं जोरदार मुसंडी मारली असून, स्पष्ट बहुमताच्या दिशेनं वाटचाल सुरू केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार 99 जागांवर पुढे आहेत, तर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार 30 जागांवर पुढे आहेत. दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार हे मुंबईत 63 जागांवर पुढे आहेत. तर मनसे 9 जागांवर पुढे आहे, मुंबईमध्ये आता भाजपचा महापौर होण्याची शक्यता आहे.
Maharashtra Municipal Election Results 2026 : जालना महापालिकेवर भाजपाची एकहाती सत्ता, थेट पंकजा मुंडे यांनी...
Jalgaon Municipal Election Results 2026 : जळगावात महापालिका निवडणुकीत 69 जागांसह महायुतीचा बोलबाला
Worli Ward 197 Election Result 2026 : आदित्य ठाकरेंना एकनाथ शिंदेंनी दिला मोठा झटका
Mumbai Election Result 2026 : मतमोजणीला 5 तास, मुंबईत आतापर्यंत कोण-कोण जिंकले त्या उमेदवारांची यादी
पुणे महापालिका जिंकताच भाजपचा मोठा निर्णय; अजितदादांशी युती नाहीच?
Pune Election Result : काम न करणारे बोलत राहिले, पुणेकर जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला - मुरलीधर मोहोळ
दरम्यान मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला जरी मोठं यश मिळालं असलं तरी देखील काही प्रभागांमध्ये धक्कादायक निकाल लागले आहेत . मुंबईत शिवसेना शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर यांना मोठा धक्का बसला आहे, त्यांचा मुलगा समाधान सरवणकर यांचा पराभव झाला आहे, सदा सरवणकर हे सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. तर दुसरीकडे अरुण गवळी यांच्या दोन्ही मुली गीता गवळी आणि योगीता गवळी यांचाही पराभव झाला आहे. मात्र दुसरीकडे प्रभाग क्रमांक चार मधून एका सामान्य डबेवाल्याचा मुलगा मंगेश दत्ताराम पांगारे यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. मंगेश पांगारे विजयी होताच डबेवाल्यांनी मोठा जल्लाष सजरा केला आहे. दरम्यान पुण्यात देखील भाजपनं जोरदार मुसंडी मारली आहे. पुण्यात भाजपनं राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शरद पवार गटाला मोठा धक्का दिला आहे.