राज ठाकरेंच्या उपस्थितीत 500 आदिवासी जोडप्यांचं लग्न

पालघर: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांची पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या उपस्थितीतीत आज पालघर जिल्ह्यातील बोईसर इथे, 500 आदिवासी जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला. दुपारी 12 वाजून 6 मिनिटांच्या मुहूर्तावर हा विवाह सोहळा संपन्न झाला. राज ठाकरे यांच्या हस्ते या विवाह सोहळ्यातील विवेक अरविंद दोडी, वय 22 आणि कविता बारागा या जोडप्याला विवाह नोंदणी […]

राज ठाकरेंच्या उपस्थितीत 500 आदिवासी जोडप्यांचं लग्न
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM

पालघर: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांची पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या उपस्थितीतीत आज पालघर जिल्ह्यातील बोईसर इथे, 500 आदिवासी जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला. दुपारी 12 वाजून 6 मिनिटांच्या मुहूर्तावर हा विवाह सोहळा संपन्न झाला. राज ठाकरे यांच्या हस्ते या विवाह सोहळ्यातील विवेक अरविंद दोडी, वय 22 आणि कविता बारागा या जोडप्याला विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आलं. या विवाह सोहळ्यासाठी राज ठाकरे पावणे बाराच्या सुमारास विवाहस्थळी दाखल झाले.

काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंचा मुलगा अमितचा लग्नसोहळा झाला. अमित ठाकरे यांचं फॅशन डिझायनर मिताली बोरुडे हिच्याशी लग्न झालं. हा विवाहसोहळा गेल्याच महिन्यात म्हणजे 27 जानेवारीला पार पडला. या लग्नाच्या धावपळीतून काहीसे निवांत झालेले राज ठाकरे आज पुन्हा लग्नाच्या धामधुमीत पाहायला मिळाले.

पालघर जिल्ह्यातील दुर्गम भागातील गरीब, शेतकरी, मजूर आणि आदिवासी समाजातील 500 जोडप्यांचा विवाहसोहळा आज आयोजित करण्यात आला. बोईसर येथील खैरेपाडा मैदानात हा सामूहिक विवाहसोहळा पार पडला.

या सामूहिक विवाहसोहळ्यात आदिवासी समाजातील 500 जोडप्यांना आशीर्वाद देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे उपस्थित राहिले.