खासदार विनायक राऊतांविरोधात गुन्हा दाखल, शिंदे गटाचे कार्यकर्ते सरसावले, आणखी कुणाविरोधात गुन्हा
मुलचेरा तालुका येथे अनेक शिवसैनिकांनी मुलचेरा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.

इरफान मोहम्मद, Tv9 मराठी, प्रतिनिधी, गडचिरोली : ठाकरे गटातील शिवसेनेचे नेते अडचणीत आले आहेत. सुषमा अंधारे, भास्कर जाधव आणि विनायक राऊत या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पंतप्रधानांची नक्कल केल्याने सुषमा अंधारेंवर गुन्हा दाखल झालाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नक्कल केल्यामुळं भास्कर जाधव यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. तसेच नारायण राणे यांच्यावर आक्षेपार्ह टीका केल्याने विनायक राऊतांवर गुन्हा नोंदविण्यात आलाय. ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदविण्यात आलाय.
नकला कोल्यामुळे सुषमा अंधारे, भास्कर जाधव आणि विनायक राऊत यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आलाय. ठाण्यातील महाप्रबोधन मेळाव्यामध्ये पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री शिंदे आणि केंद्रीय मंत्री राणे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं होतं.
खासदार विनायक राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी शिवसेना शिंदे गटानं गडचिरोली जिल्ह्यात केली. गडचिरोली जिल्ह्यात एकनाथ शिंदे आगे बढो, किरण पांडव आगे बढो असे नारे देत विनायक राऊत यांच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली.
जिल्ह्यातील मुलचेरा तालुका येथे अनेक शिवसैनिकांनी मुलचेरा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व चाळीस खासदार यांच्या आक्षेपार्ह विधान करणाऱ्या संजय राऊत यांच्या विरोधात शिवसैनिकांनी नारेबाजी केली.
मोठ्या प्रमाणात शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी मुलचेरा येथे आंदोलन स्वरूपात घोषणाबाजी केली. राकेश भैसारे यांच्या नेतृत्वात ही मागणी करण्यात आली. आधीचं नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. आता पुन्हा ठिकठिकाणी गुन्हा दाखल करण्याची मागणी शिंदे गटाचे शिवसैनिक करत आहेत. त्यामुळं ठाकरे गटाचे नेते अडचणीत आले आहेत.
