किरीट सोमैय्या यांच्या कार्यालयात पिस्तुलधारी शिरल्याने खळबळ, नवघर पोलीस ठाण्यात तक्रार

भाजपाचे नेते खासदार किरीट सोमैय्या यांच्या मुलुंड येथील कार्यालयात शनिवारी एक अज्ञात नागरिकाची झडती घेतली असता त्याच्याकडे पिस्तुल लपवण्याचे उघडकीस आले आहे.

किरीट सोमैय्या यांच्या कार्यालयात पिस्तुलधारी शिरल्याने खळबळ, नवघर पोलीस ठाण्यात तक्रार
| Updated on: Apr 20, 2025 | 10:29 PM

भाजपाचे माजी खासदार किरीट सोमैय्या यांच्या कार्यालयात अज्ञात पिस्तुलधारी शिरल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात मुलुंडच्या नवघर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या पिस्तुलधारी व्यक्तीला माजी खासदार भाजपाचे नेते किरीट सोमैय्या यांच्या सुरक्षा रक्षकाच्या प्रसंगावधानाने रोखले असता त्याच्याकडे पिस्तुल असल्याचे उघडकीस आले आहे.

भाजपाचे नेते खासदार किरीट सोमैय्या यांच्या मुलुंड येथील कार्यालयात शनिवारी एक अज्ञात नागरिकाची झडती घेतली असता त्याच्याकडे पिस्तुल लपवण्याचे उघडकीस आले आहे. खासदार किरीट सोमय्या हे दर शनिवारी नेहमीप्रमाणे जनता दरबार घेत असतात.त्यावेळी नवघर पोलीस ठाणेचा स्टाफ तिथे लावलेला असतो. काल दुपारी त्यांना भेटण्यास भिवंडी येथून फारुख चौधरी नावाची व्यक्ती आली होती.त्याकडे त्याचे परवाना असलेले पिस्टल शस्त्र होते. त्याने त्याबाबत पोलीस अधिकाऱ्यास या शस्राबद्दल सांगितले आणि पोलीस स्टाफने किरीट सोमैया यांच्या केंद्रीय सुरक्षा गार्डला त्याबद्दल माहिती दिली होती.

सोमैय्या यांना भेटून गेल्याची माहिती

किरीट सोमैया यांच्या पीएने या संशयित इसमाची झडती घेतली असता हे पिस्तुल त्यांना दिसले,त्यानंतर त्यांनी विचारणा केली असताना त्यांच्या परवानगीने या व्यक्तीचे शस्त्र बाहेर ठेवून तो सोमय्या यांना भेटून गेल्याची माहिती सूत्रांनी दिली. शनिवारी दुपारी २.३० वाजताच्या दरम्यान ही घटना घडली आहे. सायंकाळी ६.३० वाजता किरीट सोमैय्या यांच्या पीएने नवघर पोलीस ठाण्यात या संदर्भात पत्र दिले आहे. संबंधित व्यक्तीबाबत अधिक चौकशी करावी असे पत्र दिले आहे.