Mumbai Local : तो बुरखा घालून लेडीज डब्ब्यात चढला! अनेकींच्या शरीराला स्पर्श केला, महिलांना संशय येताच…

Mumbai Local : मुंबई ट्रेनमध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एक पुरुष बुरखा घालून महिलांच्या डब्यात चढला. अनेक महिलांना त्याने स्पर्श केला. पण काही महिलांना संशय आला आणि नंतर जे घडलं...

Mumbai Local : तो बुरखा घालून लेडीज डब्ब्यात चढला! अनेकींच्या शरीराला स्पर्श केला, महिलांना संशय येताच...
Ladies Dabba
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Feb 08, 2026 | 9:29 AM

लोकल ट्रेन ही मुंबईकरांचा श्वास असल्याचे म्हटले जाते. मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई लोकलने दर दिवशी जवळपास 85 लाख प्रवास करतात. या लोकल ट्रेनमध्ये महिलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी, अपंगांसाठी राखीव डबे ठेवण्यात आले आहेत. नुकताच मुंबई लोकमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक पुरुष महिलांच्या आरक्षित डब्यात बुरखा घालून शिरला आहे. त्याचे विकृतचाळे पाहून महिलांना संशय आला. नंतर नेमकं काय घडलं जाणून घ्या…

मुंबईतील मध्य रेल्वे मार्गावर महिलांच्या आरक्षित डब्यात बुरखा घालून प्रवेश केलेल्या संशयित व्यक्तीमुळे खळबळ उडाली आहे. महिला प्रवाशांना संशय आल्याने त्यांनी त्या व्यक्तीला घेरले आणि चौकशी सुरू केली. यावेळी काही महिलांनी मोबाईलवर व्हिडीओही रेकॉर्ड केला. मात्र, ट्रेन घाटकोपर स्थानकाजवळ पोहोचताच संशयित व्यक्तीने चालत्या ट्रेनमधून उडी मारून उलट दिशेने जाणाऱ्या कर्जत फास्ट लोकलमध्ये चढून पळ काढला. या घटनेमुळे मुंबई लोकलमधील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

चालत्या ट्रेनमधून थरारक पळ

मिळालेल्या माहितीनुसार, सीएसएमटीकडे (CSMT) जाणारी फास्ट लोकल ट्रेन घाटकोपर स्थानकाच्या जवळ येत असताना हा प्रकार घडला. महिलांच्या डब्यात बुरखा परिधान केलेला एक व्यक्ती दिसला. ही व्यक्ती डब्यातील इतर महिलांना अयोग्यरित्या स्पर्श करण्याचा प्रयत्न करत असल्याचे महिला प्रवाशांच्या लक्षात आले. यामुळे काही महिला प्रवाशांना संशय आला आणि त्यांनी त्या व्यक्तीला घेरून प्रश्न विचारायला सुरुवात केली. याच दरम्यान काही प्रवाशांनी घटनेचा व्हिडीओ मोबाईलवर शूट केला.

ट्रेन घाटकोपर स्थानकात थांबण्यापूर्वीच संशयित व्यक्तीने अचानक चालत्या ट्रेनमधून उडी घेतली आणि रुळ ओलांडून प्लॅटफॉर्मवर उभी असलेल्या कर्जत दिशेने जाणाऱ्या फास्ट लोकलमध्ये चढून फरार झाला.

रेल्वे पोलिसांचा संयुक्त तपास सुरू

महिला प्रवाशांनी तात्काळ रेल्वे पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यानंतर मुलुंड आणि ठाणे स्थानकांवर संशयिताचा शोध घेण्यात आला, पण त्याचा काहीही पत्ता लागला नाही. घाटकोपर RPFने रेल्वे कायद्याच्या कलम १६२ अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.