एसी लोकलचा प्रवास स्वस्त, प्रवाशांचा प्रतिसाद वाढला, तिकीट विक्रीत वाढ

| Updated on: May 06, 2022 | 10:34 AM

एसी लोकल आणि लोकलच्या प्रथम श्रेणी तिकिटांच्या दरात कपात करण्यात आली आहे. नवे दर गुरुवारपासून लागू झाले आहेत. दर कमी करण्यात आल्याने एसी लोकल तसेच प्रथम श्रेणी तिकिटांच्या दरात वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे.

एसी लोकलचा प्रवास स्वस्त, प्रवाशांचा प्रतिसाद वाढला, तिकीट विक्रीत वाढ
एसी लोकलचा प्रवास स्वस्त
Follow us on

मुंबई : वातानुकूलित लोकल (AC Local) आणि प्रथम श्रेणीच्या लोकलचे तिकीट दर हे अधिक असल्याने सर्वसामान्य प्रवाशांनी या लोकलच्या दोन्ही श्रेणीकडे पाठ फिरवली होती. मात्र वातानुकूलित रेल्वेला तसेच लोकलच्या प्रथम श्रेणीला प्रवाशांचा प्रतिसाद मिळावा यासाठी रेल्वे प्रशासनाकडून (Railway Department) दोन्ही श्रेणीच्या तिकीट दरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तिकिट दरात कपातीचा निर्णय काल गुरुवारपासून लागू झाला. भाड्यात कपात करण्यात आल्याने त्याचा सकारात्मक परिणाम हा प्रवाशांच्या संख्येवर होताना दिसून येत आहे. प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, हाती आलेल्या आकडेवारीनुसार गुरुवारी दुपारी दोन वाजेपर्यंतच मध्य रेल्वे मार्गावर एकूण 2 हजार 308 वातानुकूलित रेल्वे तिकिटांची विक्री झाली होती. तर पश्चिम रेल्वेवर (Western Railway) 3 हजार 52 तिकिटांची विक्री झाल्यचे समोर आले आहे. त्याचप्रमाणे लोकलच्या प्रथम श्रेणीच्या तिकीट खरेदीमध्ये देखील वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे.

उन्हाळ्यात प्रवाशांना दिलासा

राज्यात यंदा उन्हाचा कडाक वाढल्याचे पहायला मिळत आहे. मुंबईत देखील प्रचंड उष्णता आहे. अशा स्थितीमध्ये प्रवाशांची पाऊले आपोआपच एसी लोकलकडे वळतात. मात्र एसी लोकलचे दर हे सामान्य प्रवाशांच्या आवाक्याबाहेर असल्याने अनेक जण एसी लोकलने प्रवास करणे टाळतात. प्रवाशांची हीच आडचण लक्षात घेऊन, रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रशासनाने एसी लोकल तसेच लोकलच्या प्रथम श्रेणीच्या तिकीट दरांमध्ये कापत करण्याचा निर्णय घेतला आहे. नवे दर गुरुवारपासून लागू झाले. तिकीट दरात मोठी कपात करण्यात आल्याने एसी लोकलचा प्रवास स्वस्त झाला असून, प्रवाशांचा प्रतिसाद वाढताना दिसत आहे.

तिकीट दरामध्ये 50 टक्के कपात

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी वातानुकूलित लोकलच्या भाड्यात पन्नास टक्के कपात करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार गुरुवारपासून एसी लोकलच्या भाड्याचे नवे दर लागू झाले आहेत.  नव्या दरानुसार एसी लोकलच्या भाड्यात पन्नास टक्के कपात करण्यात आल्याने एसी लोकलचा प्रवास स्वस्त झाला आहे. प्रवासा स्वस्त झाल्याने ग्राहकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत असून, पहिल्याच दिवशी गुरुवारी दुपारी दोनपर्यंत  मध्य रेल्वे मार्गावर एकूण 2 हजार 308 वातानुकूलित रेल्वे तिकिटांची विक्री झाली होती. तर पश्चिम रेल्वेवर 3 हजार 52 तिकिटांची विक्री झाल्यचे समोर आले आहे.