AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Imran Khan: ‘तो केवळ तिथून जात होता’, इम्रान खान आंदोलनप्रकरणात वकिलांचा तो मोठा दावा…

Actor Imran Khan Lawyers claim: इम्रान खानने भारत सोडण्याच्या नोटीसला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. तर त्याचवेळी त्याच्या वकिलाने दावा केला आहे की, तो या आंदोलनाचा भाग नव्हता.

Imran Khan: 'तो केवळ तिथून जात होता', इम्रान खान आंदोलनप्रकरणात वकिलांचा तो मोठा दावा...
इम्रान खान याच्या वकिलांचा मोठा दावा
| Updated on: Oct 16, 2026 | 10:41 AM
Share

Actor Imran Khan Lawyers claim: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात मुंबईत कॉकरोच जनता पार्टीने (CJP) उग्र आंदोलन केले. त्याला उद्धव सेना आणि मनसेचे बळ मिळाले. या आंदोलनात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते इम्रान खान याने ही सहभाग घेतला होता. त्यानंतर परदेशी नागरिकांची प्रादेशिक नोंदणी कार्यालयाने (FRRO) 28 ऑक्टोबरपर्यंत त्याला भारत सोडण्याचा आदेश दिला. इम्रान खान हा भारतीय नागरीक नाहीत आणि ते या आंदोलनात सहभागी होऊ शकत नाही असा दावा कार्यालयाने केला होता. त्याविरोधात इम्रान खान याने मुंबई उच्च न्यायलयात धाव घेतली आहे. इम्रान खानने भारत सोडण्याच्या नोटीसला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. तर त्याचवेळी त्याच्या वकिलाने दावा केला आहे की, तो या आंदोलनाचा भाग नव्हता.

‘तो केवळ तिथून जात होता’

टाइम्स ऑफ इंडियाच्या एका वृत्तानुसार, इम्रान खानचे वकील जुल्फिकार मेमन, परवेज मेमन आणि चिराग नाईक यांनी इम्रान हा या आंदोलनाचा भाग नव्हता. तो तर केवळ नाना चौकातून जात होता. तेव्हा तिथे बॅरिकेटिंग लावण्यात आली होती आणि तो केवळ माध्यमांशी बोलत उभा होता. त्याचवेळी पोलिसांनी त्याला उचलले, असे म्हणणे सादर केले. परदेशी नागरीक कायद्याचे उल्लंघन केल्याचे कारण पुढे करत इम्रान खान याला 28 ऑक्टोबरपर्यंत देश सोडण्याचे निर्देश दिले आहेत. या कारवाईनंतर अभिनेत्याच्या अडचणीत वाढ झाली आहे.

त्याला या प्रकरणात गोवले जात आहे

इम्रान खान याच्या वकिलांनी पोलिसांचे सर्व आरोप फेटाळले आहेत. इम्रान खान याचा या निषेध आंदोलनाशी अथवा निदर्शनांशी कोणताही संबंध नव्हता. तो केवळ तिथून जात होता. बॅरिकेटिंग लावल्याने तो गर्दीत दिसला. माध्यमांनी त्याला पाहताच गरडा घातला. त्याला या प्रकरणात नाहक गोवले जात असल्याचा दावा वकिलांनी केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Imran Khan (@imrankhan)

मग सीसीटीव्ही फुटेज तपासा

देश सोडून जाण्याच्या आदेशाला इम्रान खानने तातडीने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. याचिकेत नाना चौकातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे आणि ते दाखवण्याची विनंती करण्यात आली आहे. वकिलांच्या मते ते त्या परिसरातून केवळ जात होते. बॅरिकेटिंगमुळे ते गर्दीत दिसले. त्यांचा या आंदोलनात, प्रदर्शनात सहभागी होण्याचा कोणताही हेतू नव्हता.

Follow Us
सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत....
Sanjay Raut : सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत स्पष्टच म्हणाले....
धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
Dharashiv FDA Action : धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय?
Mahayuti : महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय घडतंय?
10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती....
FDA : 10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती, FDA च्या पाच अधिकाऱ्यांवर थेट...
आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
CJP Protest : आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
Malegaon Case | डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला..
Mahayuti : फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला पाठिंबा, नेमकं प्रकरण काय?
दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे....
CJP Tiranga Rally : दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे देशाचं लक्ष
ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल
Abhijeet Dipke : ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल, दिल्लीचं रूपांतर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम