आम्ही निवडणुकीचा फारसा विचार करत नाही, महाविकास आघाडीने जे वचन दिलंय ते पूर्ण करणार : आदित्य ठाकरे

| Updated on: Feb 02, 2021 | 2:49 PM

महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेने जी वचनं दिली आहेत ते आम्ही पूर्ण करुन दाखवणार, असं आदित्य ठाकरे म्हणाले (Aditya Thackeray on BMC Budget 2021)

आम्ही निवडणुकीचा फारसा विचार करत नाही, महाविकास आघाडीने जे वचन दिलंय ते पूर्ण करणार : आदित्य ठाकरे
Follow us on

मुंबई : “महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेने जी वचनं दिली आहेत ते आम्ही पूर्ण करुन दाखवणार. निवडणुकीचा तेवढा आम्ही विचार करत नाही. अर्थात निवडणूक ही लढावी लागते. त्यासाठी आपण मेहनत घेतो. पण त्यापुढे जावून जेव्हा आपण जिंकून येता तेव्हा मधल्या पाच वर्षाच्या कालावधीत असतो. या पाच वर्षात लोकांना जी वचनं दिली असतात त्यांची कामं करायची असतात”, अशी भूमिका पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मांडली (Aditya Thackeray on BMC Budget 2021).

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली MMRDA मुख्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत वरळी-शिवडी कनेक्ट ब्रीज, कफ परेड प्रकल्पाविषयी चर्चा झाली. या बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली (Aditya Thackeray on BMC Budget 2021).

“आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक अडीच ते पाच वर्षात विविध पातळीवर निवडणूक होत असतात. त्यामुळे मुंबई महापालिकेची निवडणूक लक्षात ठेवून महापालिकेचं बजेट सादर होणार नाही. मुंबईच्या विकासाच्या दृष्टीने बजेट सादर होईल”, असं मत आदित्य ठाकरे यांनी मांडलं.

“केंद्राच्या बजेटवर काही लोकांच्या प्रतिक्रिया प्रसारमाध्यांसमोर बघितल्या. निवडणुका नाहीत त्या राज्यांमध्ये जास्त तरतूद करण्यात आलेली नाही. निवडणुका लक्षात घेऊन काही राज्यांमध्ये जास्त तरतूद करण्यात आली आहे”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

“मुंबई महापालिका मुख्यालय पर्यटकांसाठी खुलं करण्याचा निर्णय घेतल्यानंतर संपूर्ण मुख्यालयाची वास्तू बघितली. तेव्हा महापालिका मुख्यालयाच्या वास्तूवर सर्वात वरच्या मजल्यावर देशातील सर्वात एक नंबरचं शहर, असं लिहिलं होतं. तो दर्जा कायम राहिल, असंच बीएमसीचं बजेट यईल. मला याबाबत खात्री आहे”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

केंद्राच्या बजेटवर महाविकास आघाडीची टीका

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी काल (1 फेब्रुवारी) संसदेत अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पाद काही राज्यांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ज्या राज्यांसाठी जास्त तरतूद करण्यात आली आहे, त्या राज्यांमध्ये पुढच्या काही महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे विरोधी पक्षाकडून या अर्थसंकल्पावर टीका करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक नेत्यांनी केंद्राच्या अर्थसंकल्पावर टीका केली आहे. खरं बघायला गेलं तर केंद्राच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रात खरंच कोणतीही विशेष तरतूद करण्यात आलेली नाही. फक्त नाशिक आणि नागपूर मेट्रो प्रकल्पाचा उल्लेख काल अर्थमंत्र्यांनी बजेटमध्ये केला.

हेही वाचा : 

अहिल्यादेवींच्या पुतळ्याचं अनावरण करा अन्यथा…., पडळकरांचं मुख्यमंत्र्यांना 15 दिवसांचं अल्टिमेटम