5 फेब्रुवारी रोजी एमएसईबीवर ‘टाळे ठोको’ आंदोलन; भाजप देणार आघाडी सरकारला शॉक

शेतकरी आणि वीज ग्राहकांना वीज कापण्यासाठी राज्य सरकारने नोटीसा पाठवल्या आहेत. त्यावर भाजपने संताप व्यक्त केला आहे. (chandrashekhar bawankule reaction on inflated power bills)

5 फेब्रुवारी रोजी एमएसईबीवर 'टाळे ठोको' आंदोलन; भाजप देणार आघाडी सरकारला शॉक

नागपूर: शेतकरी आणि वीज ग्राहकांना वीज कापण्यासाठी राज्य सरकारने नोटीसा पाठवल्या आहेत. त्यावर भाजपने संताप व्यक्त केला आहे. या नोटीसा मागे घ्या अन्यथा येत्या 5 फेब्रुवारी रोजी राज्यात एमएसएईबीच्या कार्यालयांना टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा माजी ऊर्जा मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. राज्यात एमएसईबीच्या साडेसातशे मंडळांवर टाळे ठोको आंदोलन करण्यात येणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. (chandrashekhar bawankule reaction on inflated power bills)

चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाचा इशारा दिला. राज्य सरकारने शेतकरी आणि ग्राहकांना वीज बिल भरण्यासाठी नोटीसा पाठवल्या आहेत. वीज बिल न भरल्यास वीज कापण्याचा इशाराही सरकारकडून देण्यात आला आहे. सरकारची ही अरेरावी आम्ही खपवून घेणार नाही. या नोटीसा सरकारने मागे घ्याव्यात. नाही तर 5 फेब्रुवारी रोजी एमएसईबीच्या साडेसातशे मंडळांना टाळे ठोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बावनकुळे यांनी दिला आहे. यावेळी एमएसईबी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलनही करण्यात येणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं.

भाजपचे कार्यकर्ते झेंडे घेऊन उभे राहतील

आम्ही राज्यातील एकाही शेतकऱ्यांची किंवा ग्राहकांची वीज कापू देणार नाही. अधिकारी वीज कापण्यासाठी आल्यास भाजपचे कार्यकर्ते झेंडे घेऊन घटनास्थळी उभे राहून त्याचा प्रतिकार करतील, असंही त्यांनी सांगितलं.

फडणवीसांच्या मनगटात ताकद होती

आमच्याकाळात आम्ही शेतकऱ्यांची वीज कापली नाही. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनगटात ताकद होती. पाच वर्षे शेतकऱ्यांची वीज कापणार नाही, असं फडणवीसांनी ठामपणे सांगितलं होतं. पण या मुख्यमंत्र्यांच्या मनगटात तसं सांगण्याची ताकद नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

महावितरणला 10 हजार कोटी द्या

राज्य सरकारने वीज बिल माफ करण्यासाठी येत्या अर्थसंकल्पात ऊर्जा खात्याला 10 हजार कोटी रुपये द्यावेत. तसेच शेतकऱ्यांच्या योजना आणि पायाभूत सुविधांसाठी कंपन्यांना 40 हजार कोटी रुपये द्यावेत. सरकारकडे पैसे नसतील तर त्यांनी कर्ज काढावं. शेतकऱ्यांसाठी कर्ज नाही घेणार तर कुणासाठी कर्ज घेणार? असा सवाल करतानाच राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नये, असंही ते म्हणाले. (chandrashekhar bawankule reaction on inflated power bills)

 

संबंधित बातम्या:

राधाकृष्ण विखे पाटलांच्या ह्या फोटोची महाराष्ट्रभर चर्चा का?

तुम्हाला केंद्रात मंत्रीपद मिळणार आहे का; नारायण राणे खुर्चीतून मागे वळून म्हणाले….

ऊर्जा खात्याला तातडीने 10 हजार कोटी द्या, नाही तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; बावनकुळेंची मागणी

(chandrashekhar bawankule reaction on inflated power bills)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI