Tukaram Mundhe Fda : डॉमिनोज पिझ्झानंतर तुकाराम मुंढेंनी फ्रुटी, कॅन्डी ज्यूस वाल्यांना दिला दणका, 11 तास सुरु होती रेड
Tukaram Mundhe Fda : एफडीएच्या आठ अधिकाऱ्यांच्या पथकाने 13 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता सुरू केलेलं हे धाडसत्र 14 ऑगस्टच्या पहाटे 5 वाजता थांबलं. तब्बल 11 तास झाडझडती सुरु होती.

IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांची सध्या सगळीकडे चर्चा आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सध्या अन्न व औषध प्रशासन विभागाकडून भेसळखोर, अन्ना सुरक्षा मानकांचं उल्लंघन करणारे आणि नियम मोडणारी मोठमोठी हॉटेल्स, उपहारगृह आणि रेस्टॉरंट विरुद्ध जोरदार कारवाई सुरु आहे. अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभाग किती कणखरतेने आणि मजबुतीने काम करु शकतो हे तुकाराम मुंढे यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिलं आहे. बुधवारी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून मुंबईतील डॉमिनोज पिझ्झाच्या चार आउटलेट्सवर कारवाई करण्यात आली. तिथे व्हेज-नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म वापरला जात होता. गुरुवारी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून मुंबईतील चेंबूर परिसरात असलेल्या ‘पार्ले अॅग्रो’ कंपनीच्या गोदामावर अचानक धाड टाकण्यात आली. या कारवाईत मुदत संपलेल्या एक्सपायरी डेट ओलांडून गेलेली फ्रुटी, अॅपे फिज, कोल्ड ड्रिंक्स आणि कॅन्डी ज्यूसचा 1 लाख रुपयांहून अधिक किमतीचा साठा जप्त करण्यात आला.
एफडीएच्या आठ अधिकाऱ्यांच्या पथकाने 13 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता सुरू केलेलं हे धाडसत्र 14 ऑगस्टच्या पहाटे 5 वाजता थांबलं. तब्बल 11 तास झाडझडती सुरु होती. बुधवारी एफडीएकडून विलेपार्ले पश्चिम, बोरिवली पश्चिम आणि घाटकोपर पश्चिम येथील डॉमिनोज पिझ्झा आउटलेट्सचे परवाने निलंबित करण्यात आले. त्याशिवाय मलकापूर आणि सातारा जिल्ह्यातील डॉमिनोज आउटलेटसचे परवानेही निलंबित करण्यात आले. ज्यूबिलंट फूडवर्क्स अंतर्गत हे आउटलेट्स सुरु होते.
डॉमिनोज आउटलेटवर कारवाई का?
FDA ने ‘पार्ले अॅग्रो’चं गोदाम सील केलं असून माल वाहतुकीसाठी वापरली जाणारी दोन वाहनही जप्त केली आहेत. एफडीएच्या पुढील आदेशापर्यंत या गोदामातून कोणत्याही अन्नपदार्थाची विक्री, वाहतूक करता येणार नाहीय.बंदीअसेल. विलेपार्ले पश्चिमेला असलेल्या डॉमिनोज आउटलेटमध्ये पिण्याच्या पाण्याची खराब व्यवस्था होती, अन्न स्टोरेज व्यवस्था नीट नव्हती, पेस्ट कंट्रोल एकूणच अस्वच्छता मोठ्या प्रमाणात होती.त्यामुळे त्यांचा परवाना निलंबित करण्यात आला. तुकाराम मुंढे यांनी सध्या कारवाईचा धडाका लावला आहे. त्यांच्या या मोहिमेचं जनसामान्यांकडून स्वागत होत आहे.