Dahihandi : सरकारनंतर दहीहंडीवरून उद्धव VS शिंदे, ठाण्यात उद्धव गट करणार सर्वात मोठा कार्यक्रम

| Updated on: Aug 19, 2022 | 3:43 PM

भाजपकडून आदित्य ठाकरे यांच्या विधानसभा क्षेत्रात वरळी येथे सर्वात मोठी दहीहंडीचा कार्यक्रम घेत आहे. याची धुरा मुंबईचे भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडं सोपविण्यात आली आहे. राज ठाकरे यांनीही जिंकणाऱ्या टीमला 55 लाख रुपये आणि स्पेन फिरवून आणण्याचा दावा केला आहे.

Dahihandi : सरकारनंतर दहीहंडीवरून उद्धव VS शिंदे, ठाण्यात उद्धव गट करणार सर्वात मोठा कार्यक्रम
सरकारनंतर दहीहंडीवरून उद्धव VS शिंदे
Follow us on

मुंबई : महाराष्ट्रात कृष्ण जन्माष्टमीनिमित्त (Krishna Janmashtami) होणाऱ्या दहीहंडीवरून शिवसेनेत पुन्हा लढाई सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून सरकार घेतल्यानंतर शिंदे गट आता दहीहंडीच्या माध्यमातून प्रदर्शन करणार आहे. ठाणे आणि दादरमध्ये शिंदे गटाचे आमदार यांनी आज दहीहंडीच्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शिवसेनेचे दोन्ही गट समोरासमोर पुन्हा आले आहेत. महाराष्ट्र सरकारनं दहीहंडी कार्यक्रमात भाग घेणाऱ्या गोविंदांना सरकारी नोकरीच्या कामातून सुट दिली आहे. दुर्घटनेत मृत्यू पावणाऱ्यांना 10 लाख आणि जखमींना 7 लाख रुपये मोबदला देण्याची घोषणा केली आहे. शिंदे गटाचं लक्ष्य मुंबई महापालिका निवडणुकीवर (Mumbai Municipal Elections) आहे. सध्या उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या ताब्यात मुंबई महापालिका आहे.

शिंदे गटाची तयारी काय

शिंदे गट अनंत दिघे दहीहंडी प्रोग्रामचे आयोजन राज्यभर करत आहे. ठाण्यात तीनशेपेक्षा जास्त टीम दहीहंडीच्या कार्यक्रमात भाग घेतील. शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार प्रताप सरनाईक यांना दहीहंडी कार्यक्रमाची धुरा सोपविण्यात आली आहे.

उद्धव गटाची तयारी काय

उद्धव गटाकडून युवक सेनेला मुंबईत शिवसेना भवन आणि गीरगावमध्ये खासदार राजन विचारे यांच्याकडं दहीहंडीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. येथे जिंकणाऱ्या टीमला अडीच लाख रुपये दिले जातील.

हे सुद्धा वाचा

भाजप-मनसेचीही मैदानात उडी

शिवसेनेशिवाय भाजप आणि मनसेनं दहीहंडी कार्यक्रमात सहभाग घेतला. भाजपकडून आदित्य ठाकरे यांच्या विधानसभा क्षेत्रात वरळी येथे सर्वात मोठी दहीहंडीचा कार्यक्रम घेत आहे. याची धुरा मुंबईचे भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडं सोपविण्यात आली आहे. राज ठाकरे यांनीही जिंकणाऱ्या टीमला 55 लाख रुपये आणि स्पेन फिरवून आणण्याचा दावा केला आहे.

दहीहंडीचे दोन मोठे कार्यक्रम

शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांची संस्कृती युवा प्रतिष्ठान ठाण्यात दहीहंडीचे आयोजन करते. 2012 ममध्ये जय जवान गोविंदा मंडळाने 43.79 फूट आणि 9 मनोरे तयार करून गिनीज वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदविलं आहे. ठाण्यातील संघर्ष प्रतिष्ठान समिती दहीहंडीचे आयोजन करणारी सर्वात श्रीमंत समिती समजली जाते. ही समिती जिंकणाऱ्या टीमला एक कोटी रुपये आणि सोनं बक्षीस रुपात देते.