
मुंबई विमानतळावर एक मोठा विमान अपघात टळला आहे. एअर इंडियाचे विमान लँडिंग करत असताना रनवेवर घसरले. हे विमान कोच्चीहून मुंबईला येत होते. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (CSMIA) प्रवक्त्याने सांगितले की, 21 जुलै 2025 रोजी सकाळी 9:27 वाजता कोच्चीहून येणारे एक विमान मुंबईच्या रनवेवरून बाहेर घसरले. रनवेवरून बाहेर घसरण्याच्या घटनेनंतर तातडीने CSMIA च्या आपत्कालीन प्रतिसाद पथकांना कार्यरत करण्यात आले. सर्व प्रवासी आणि चालक दल पूर्णपणे सुरक्षित आहेत.
प्रवक्त्यांनी पुढे सांगितले की, मुख्य रनवे 09/27 मध्ये किरकोळ नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे, विमानतळावरील कामकाज सुरू ठेवण्यासाठी दुसरा रनवे 14/32 कार्यान्वित करण्यात आला आहे. CSMIA मध्ये प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे.
वाचा: ब्रेकींग! पुन्हा एकदा मोठी दुर्घटना, शाळेवरच कोसळलं विमान
प्रवासी आणि चालक दलाचे सदस्य विमानातून उतरले
एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी पुढे सांगितले की, 21 जुलै 2025 रोजी कोच्चीहून मुंबईला येणाऱ्या फ्लाइट क्रमांक AI2744 चे लँडिंग होत असताना मुसळधार पावसामुळे लँडिंगनंतर विमानाला रनवेवरच चक्कर मारावी लागली. तरीही, विमान सुरक्षितपणे गेटपर्यंत पोहोचवण्यात आले आणि सर्व प्रवासी तसेच चालक दलाचे सदस्य सुरक्षितपणे विमानातून उतरले. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विमानाची तपासणी करण्यासाठी ते थांबवण्यात आले आहे. प्रवासी आणि चालक दलाच्या सुरक्षेला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे.