AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कापून टाकू…; शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याला मध्यरात्री धमक्यांचे फोन, नेमकं काय घडलं?

छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना अज्ञाताकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मध्यरात्री वारंवार येणाऱ्या फोनमुळे दानवे यांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार करत संरक्षणाची मागणी केली आहे.

कापून टाकू...; शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याला मध्यरात्री धमक्यांचे फोन, नेमकं काय घडलं?
Ambadas Danve Death Threat
| Updated on: Mar 16, 2026 | 10:49 AM
Share

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून अंबादास दानवे यांना मध्यरात्रीच्या सुमारास सातत्याने धमक्यांचे फोन येत आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तांना पत्र लिहून सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. याबद्दल क्रांती चौक पोलीस ठाण्यात अदखलपात्र (NC) गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

नेमकी घटना काय?

अंबादास दानवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या १२, १३ आणि १४ मार्च रोजी त्यांना अज्ञात नंबरवरून सतत फोन येत होते. १५ मार्च रोजी रात्री १ वाजून ५४ मिनिटांनी पुन्हा फोन आला. ज्यामध्ये तुला कापून टाकू, ठोकून टाकू अशी थेट धमकी देण्यात आली. वारंवार होणाऱ्या या त्रासामुळे दानवे यांनी अखेर पोलीस प्रशासनाकडे धाव घेतली आहे.

विशेष म्हणजे, विरोधी पक्षनेते पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर गेल्या महिन्यातच अंबादास दानवे यांची सरकारी सुरक्षा कमी करण्यात आली आहे. माझ्या व माझ्या कुटुंबियांच्या संरक्षणाला यामुळे धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती दानवे यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे.

एकाच फोनवरुन वारंवार फोन

अंबादास दानवे यांनी टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नेमकं काय घडलं, याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. मागच्या ३ ते ४ दिवसांपासून मला सतत फोन येत आहे. मला अशा फोनची सवय आहे. अनेक जण मला जाब विचारायला फोन करतात. तुम्ही असं का केलं, तसं का केलं, असं मला विचारत असतात. पण ते तेवढ्यापुरतं असतं. आम्ही त्यांच्या फार काही नादी लागत नाही. हे रोजचचं आहे. पण गेल्या आठवड्यात दर दोन तीन दिवस रात्री ११, १२, १, २, २.३० वाजता मला धमकीचे फोन येत होते. एकाच फोनवरुन वारंवार फोन येत होते. मी तीन दिवस त्याची काही दखल घेतली नाही.

पण चौथ्या दिवशी मला असं वाटलं की आपण याबद्दल तक्रार करुन ठेवावी. एक खबरदारी म्हणून पोलिसात तक्रार केली. मी धमक्यांना घाबरत नाही. पोलिसांना नंबरसहित या तक्रारीची माहिती दिली आहे. ते मला जीवे मारण्याची धमकी असं बोलले आहेत. पण मला याची सवय आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून संबंधित फोन नंबर कोणाचा आहे, याचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती अंबादास दानवे यांनी दिली.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी