ओबीसी समाजाची समजूत काढण्यासाठी अजित पवार आझाद मैदानात

| Updated on: Jul 05, 2019 | 4:57 PM

मुंबई : मराठा आरक्षणाचं विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर झाल्यानंतर, एकीकडे मराठा समाजाने राज्यभर जल्लोष व्यक्त केला, तर ओबीसी समाजाच्या काही संघटनांनी विरोधाचा सूर काढला. ओबीसींच्या काही संघटना मुंबईतील आझाद मैदानात निदर्शनं सुद्धा करत आहेत. या ओबीसी नेत्यांची समजूत काढण्यासाठी स्वत: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार विधिमंडळाचं कामकाज संपल्यानंतर थेट आझाद मैदानात दाखल झाले. अजित […]

ओबीसी समाजाची समजूत काढण्यासाठी अजित पवार आझाद मैदानात
Follow us on

मुंबई : मराठा आरक्षणाचं विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर झाल्यानंतर, एकीकडे मराठा समाजाने राज्यभर जल्लोष व्यक्त केला, तर ओबीसी समाजाच्या काही संघटनांनी विरोधाचा सूर काढला. ओबीसींच्या काही संघटना मुंबईतील आझाद मैदानात निदर्शनं सुद्धा करत आहेत. या ओबीसी नेत्यांची समजूत काढण्यासाठी स्वत: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार विधिमंडळाचं कामकाज संपल्यानंतर थेट आझाद मैदानात दाखल झाले.

अजित पवार यांनी आझाद मैदानात जाऊन ओबीसी संघटना आणि मराठा संघटनांच्या भेटी घेतल्या. तेथे उपस्थित आंदोलकांच्या भेटी घेतल्या. यावेळी अजित पवार यांनी नाराज ओबीसी नेत्यांना समजावलं. त्यांच्याशी संवाद साधला. तसेच, ते ओबीसी आंदोलकांनी भेटल्यानंतर पुढे मराठा आंदोलकांचीही भेट घेऊन, त्यांच्याशी चर्चा केली.

मराठा आरक्षण विधेयक मंजूर

मराठा आरक्षणाचं विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर झालं. त्यानंतर मराठा समाजाच्या मुंबईसह राज्यभर एकच जल्लोष सुरु करण्यात आला. मात्र, मराठा समाजाला एसईबीसी या स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षण दिल्याने ओबीसी समाजाने नाराजी व्यक्त केली असून, आझाद मैदानात या आरक्षणाविरोधात ओबीसी समाजातील काही संघटनांनी निदर्शनं केली.

मराठा आरक्षण : 15 महत्त्वाचे मुद्दे

विधानसभा आणि विधान परिषद अशा दोन्ही सभागृहात एकमताने मराठा आरक्षणाचं विधेयक मंजूर झाल्यानंतर आता राज्यपालांच्या स्वाक्षरीची प्रतिक्षा आहे. राज्यपालांची स्वाक्षरी झाल्यानंतर विधेयकाचं कायद्यात रुपांतर होईल आणि तातडीने लागूही होईल.

पाहा व्हिडीओ :