AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar : महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप; सेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसही फुटली

अजित पवार यांचा गट राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटलेला आहे. ते शिंदे-भाजप सरकारसोबत सहभागी होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल हेदेखील राजभवनावर दाखल झाले आहेत.

Ajit Pawar : महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप; सेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसही फुटली
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Jul 02, 2023 | 2:04 PM
Share

मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबरोबर असणारा गट हा शिंदे-भाजप सरकारसोबत जाणार आहे. शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मोठी फूट पडली आहे. राष्ट्रवादीचे ९ आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपदाची तर, छगन भुजबळ हे कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

३० आमदारांच्या सह्यांचे पत्र

३० आमदारांचं सह्यांचं पाठिंबा असलेलं पत्र अजित पवार यांच्यासोबत आहेत. काही दिवसांपूर्वी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची कार्याध्यक्षपदी निवड केली होती. प्रफुल्ल पटेल हे राजभवनावर दाखल झाले आहेत. अजित पवार यांचा गट राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटलेला आहे. ते शिंदे-भाजप सरकारसोबत सहभागी होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल हेदेखील राजभवनावर दाखल झाले आहेत.

सायंकाळी शपथविधी होण्याची शक्यता

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ५४ आमदार आहेत. त्यापैकी ३० आमदारांचा पाठिंबा अजित पवार यांना आहे. या ३० आमदारांच्या सह्यांचं पत्र अजित पवार यांच्याकडे आहे. हे पत्र घेऊन अजित पवार हे राजभवनावर पोहचले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३० आमदारांच्या सह्यांचं पाठिंब्याचं पत्र अजित पवार यांच्याकडे आहे. या पाठिंब्याच्या सह्यांचं पत्र अजित पवार हे राज्यपालांना सुपुर्त करतील. त्यानंतर आज सायंकाळी राजभवनात शपथविधी होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्रीसुद्धा राजभवनावर दाखल

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेसुद्धा राजभवनावर दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेसुद्धा लवकरच राजभवनावर दाखल होणार आहेत. महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. अजित पवार यांच्यासोबत ३० आमदार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत आहेत. संध्याकाळी सहा वाजता अजित पवार यांच्यासह ९ मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती आहे.

Follow Us
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; शिंदेंचं विधान
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; एकनाथ शिंदे यांचं भावनिक विधान
पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक...
Sunetra Pawar : पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पह
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पहा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले...
बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
Jay Shah : बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई गँगशी कनेक्शन उघड
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह...
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह अनेक नेत्यांची उपस्थिती!
जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
Latur Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध...
मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान...
Sanjay Raut : मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान, राऊतांच्या दाव्याने खळबळ