Amit Satam : सेव्हन हिल्स रुग्णालय कर्करोग रुग्णालय म्हणून सुरू करा; आमदार साटम यांची पालिका आयुक्तांकडे मागणी

| Updated on: Aug 10, 2022 | 4:20 PM

Amit Satam : आता सेव्हन हिल्स रुग्णालयाची वास्तू पूर्णत: बांधून तयार आहे. तसेच यासाठी लागणारे मनुष्यबळही उपलब्ध आहे. त्यामुळे या रुग्णालयाचे रुपांतर कर्करोग व मल्टीस्पेशालिटी रुग्णालयामध्ये करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे.

Amit Satam : सेव्हन हिल्स रुग्णालय कर्करोग रुग्णालय म्हणून सुरू करा; आमदार साटम यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
सेव्हन हिल्स रुग्णालय कर्करोग रुग्णालय म्हणून सुरू करा; आमदार साटम यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: अंधेरी मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालय (seven hills hospital) कर्करोग रुग्णालय म्हणून सुरू करावे, अशी मागणी भाजप आमदार अमित साटम (amit satam) यांनी केली आहे. अमित साटम यांनी महापालिका (bmc) आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. सेव्हन हिल्स रुग्णालयाने कोविडच्या काळात अत्यंत चांगलं काम केलं होतं. अनेक कोविडच्या रुग्णांना या रुग्णालयाचा फायदा झाला. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचले. त्यामुळे आता महापालिकेने हे रुग्णालय स्वत: ताब्यात घेऊन चालवणे आवश्यक आहे. 2004च्या ठरावानुसार महापालिकेच्या भूखंडावर 1300 खाटांचे कर्करोग व मल्टिस्पेशालिटी रुग्णालय बांधून चालविण्यास सदर कंपनीला दिल होते. यापूर्वीही या जागेवरील अर्धवट वास्तू उभारण्यात आली होती. त्यामागेही कर्करोग रुग्णालय बांधणे हाच मूळ हेतू होता, याकडे अमित साटम यांनी पालिका आयुक्तांचं लक्ष वेधलं आहे.

कोविडच्या महामारीत अनेक रूग्णालयांनी प्रामाणिकपणे सेवा दिली आहे. अनेकांचे प्राण वाचवले आहेत. त्यात अंधेरी मरोळ भागातील सेव्हन हिल्स या रूग्णालयाचे अग्रक्रमाने नाव घ्यावे लागेल. कोविड काळात महापालिकेने हे रूग्णालय महापालिकेने ताब्यात घेतले होते. मागील काही महिन्यांपासून मुंबईतील कोविड रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. आता आठ कोविड सेंटर बंद करण्यात आले आहे, असं साटम या पत्रात म्हणतात.

हे सुद्धा वाचा

महापालिकेने धोरणात्मक निर्णय घ्यावा

काही कोविड सेंटर बंद करण्यात आले असले तरी आताही सेव्हन हिल्स हे कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. पंरतु ज्या हेतून सेव्हन हिल्स कंपनीला हे रुग्णालय चालवण्यास दिले होते. त्याच हेतूप्रमाणे सदर रुग्णालय महापालिकेने स्वत: चालवणे आवश्यक आहे. ते म्हणजे 2004च्या ठरावानुसार महापालिकेच्या भूखंडावर 1300 खाटांचे कर्करोग व मल्टीस्पेशालिटी रूग्णालय बांधून चालविण्यास सदर कंपनीला दिले होते. यापूर्वीही या जागेवरील अर्धवट वास्तू उभारण्यात आली होती. त्यामागेही कर्करोग रुग्णालय बांधणे हाच मूळ हेतू होता. आता सेव्हन हिल्स रुग्णालयाची वास्तू पूर्णत: बांधून तयार आहे. तसेच यासाठी लागणारे मनुष्यबळही उपलब्ध आहे. त्यामुळे या रुग्णालयाचे रुपांतर कर्करोग व मल्टीस्पेशालिटी रुग्णालयामध्ये करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे. प्रशासनाने त्याप्रमाणे निर्णय घेत कार्यवाही करावी आणि जनतेला आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही साटम यांनी केली आहे.

म्हणून सेव्हन हिल्सचं कॅन्सर रुग्णालयात रुपांतर करा

या रुग्णालयामध्ये कॅथ लॅब, रेडिएशन थेरेपी, न्यूक्लियर मेडिसीन, नेप्रोलॉजी एन्डोक्रीनॉलॉजी, न्युअलॉजी आदी प्रकारच्या आरोग्य विषयक सेवा सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे कर्करोग, हृदयविकार, किडनी, मेंदू, डायबेटीज, थायरॉईड आदी गंभीर आजारांवर यामुळे उपचार करता येवू शकतो. सध्या कर्करोगाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी एकमेव टाटा रुग्णालय असून सर्व सामान्य गरीबांना या रुग्णालयांमध्ये दाखल होताना अनेक अडचणींचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे महापालिकेने केईएम, शीव, नायर व कूपरच्या धर्तीवर सेव्हन हिल्स रुग्णालयामध्ये वैद्यकीय महाविदयालयासह कर्करोग व मल्टीस्पेशालिटी रुग्णालय सुरु करण्यासाठी प्रयत्न करावेत, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.