लग्नाला नकार दिला म्हणून ओढणीने गळा दाबून ऑटोचालकाची हत्या, 6 मुलांची आई झाली गजाआड

| Updated on: Aug 28, 2022 | 5:10 PM

हे दोघेही रिक्षात होते. जोहरा मागे बसली होती तर ड्रायव्हरच्या सीटवर रमजान बसलेला होता. या मुद्द्यावरुन या दोघांत मारामारी झाली. त्यावेळी रमजानचा गळा दाबण्यासाठी जोहराने तिच्या ओढणीचा वापर केला.

लग्नाला नकार दिला म्हणून ओढणीने गळा दाबून ऑटोचालकाची हत्या, 6 मुलांची आई झाली गजाआड
आरे कॉलनी
Image Credit source: social media
Follow us on

मुंबई- एका 32 वर्षांच्या महिलेला हत्येच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी आरे कॉलनीतून अटक केली आहे. या महिलेने तिच्या प्रियकराची हत्या केल्याचा तिच्यावर आरोप आहे. पोलसांनी केलेल्या तपासात या महिलेचे नाव जोहरा असे असल्याचे समोर आले आहे. जोहराने तिचा प्रियकर रमजान शेख याची ओढणीने गळा दाबून त्याची हत्या केली. रमजान शेख हा ऑटोरिक्षा चालवत होता आणि त्याचे वय 26 वर्षांचे होते. जोहरा आणि रमजान गेल्या वर्षभरापासून लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत असल्याची माहिती आहे. हे दोघेही फिल्टर पाड्यात राहत होते. लग्नावरुन या दोघांमध्ये वादविवाद सुरु होता. त्याच्यासाठी ते पोलीस स्टेशनमध्येही जात होते. याच सगळ्यातून प्रेयसीने प्रियकराची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. रमजानच्या हत्येनंतर केलेल्या चौकशीत जोहराने तिचा गुन्हाही कबल केला असल्याची माहिती आहे.

रमजानची लग्न करण्याची इच्छा नव्हती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जोहराला रमजानशी लग्न करण्याची इच्छा होती. ज्यावेळी हे दोघे एकत्र राहत होते, त्यावेळी रमजान तिच्याशी लग्न करण्यासाठी तयारही होता. मात्र गेल्या काही महिन्यांपासून तो लग्नाचे नाव घेत नव्हता. त्यामुळेच जोहराला रमजानच्या वागण्यावर संशय होता. जोहराचे आधी लग्न झालेले आहे आणि तिला त्या नवऱ्यापासून 6 मुलं आहेत. दोन वर्षांपूर्वी ती पतीपासून वेगळी राहत होती. जोहरा तिच्या दोन मुलांसह रमजानसोबत राहत होती. तर तिची इतर चार मुले ही उ. प्रदेशात तिच्या आईकडे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

कशी केली हत्या?

शनिवारी जोहरा आणि रमजान यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर त्यांनी पोलिसांत जाण्याचा निर्णय घेतला. जोहराने रमजानवर खोटी आश्वासने देऊन फसवणूक केल्याचा आरोप केला. दुपारी एकच्या सुमारास आरे कॉलनीतील एका पिकनिक पाँइंटजवळ, एका पोलिसांच्या चौकीवर जाण्यासाठी हे दोघे निघाले होते. वाटेत रमजानने पोलिसांकडे जाण्यास नकार दिला. त्यावेळी हे दोघेही रिक्षात होते. जोहरा मागे बसली होती तर ड्रायव्हरच्या सीटवर रमजान बसलेला होता. या मुद्द्यावरुन या दोघांत मारामारी झाली. त्यावेळी रमजानचा गळा दाबण्यासाठी जोहराने तिच्या ओढणीचा वापर केला.

हे सुद्धा वाचा

हत्या केल्यानंतर जोहराचे आत्मसमर्पण

रमजानची हत्या केल्यानंतर जोहरा स्वत: पवई पोलीस ठाण्यात पोहचली आणि तिथे तिने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी तपास केल्यानंतर त्यांना रमजानचा मृतदेह सापडला. जोहराच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.