मोठी बातमी! मुंबईच्या महापौर कार्यालयासह 5 ठिकाणांना बॉम्बस्फोटाची धमकी, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर
मुंबईमध्ये पुन्हा एकदा बॉम्बने उडवून देण्याची धमकी आली आहे. या धमकीनंतर एकच खळबळ उडाली आहे. सुरक्षा यंत्रणां या अलर्ट मोडवर आल्या असून सध्यातरी तपासणीमध्ये काहीही आढळून आलेलं नसल्याने रुटीन कार्यालयीन कामकाज सुरु आहे.

मुंबईत पुन्हा बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा मेल आला आहे. यामध्ये महापौरांच्या कार्यालयाचा उल्लेख करण्यात आला आहे. महापौर कार्यालय, मुंबईतील बँक, कोर्ट, अमिताभ बच्चन बंगला, महालक्ष्मी रेसकोर्स, छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळ या ठिकाणांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी या मेलमधून देण्यात आली आहे. त्यानंतर महानगर पालिकेचा उल्लेख असल्याने पालिकेत सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आलेल्या आहेत. तपासणी पूर्ण काहीही संशयास्पद आढळलं नाही.
मुंबईमध्ये पुन्हा एकदा ही धमकी आल्याने एकच खलबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून महापौर कार्यालय बॉम्बने उडवून टाकण्याची धमकी दिली जात आहे. ही धमकी देणारा मेल वारंवार येत आहे. मागच्या दोन आठवड्यांपूर्वीही असाच एक मेल आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा आज असा एक मेल आला आहे. या मेलमध्ये धक्कादायकरित्या आता एक दोन नव्हे तर तब्बल ५ ठिकाणांना लक्ष्य केलं जाणार असल्याचं म्हटलं आहे. यामध्ये मुंबईचे महापौर यांचे कार्यालय बईतील बँक, कोर्ट, अमिताभ बच्चन बंगला, महालक्ष्मी रेसकोर्स, छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळ ही महत्त्वाची ठिकाणी बॉम्बस्फोटने उडवून देऊ असा हा धमकीचा मेल आहे.
धक्कादायक बाब म्हणजे अशा पद्धतीने मेल पाठवून धमकी देण्याचा प्रकार हा तिसऱ्यांदा होत आहे. आज तिसऱ्यांदा हा धमकीचा मेल प्राप्त झाला आहे. त्यामुळे प्रत्येकवेळी सुरक्षा यंत्रणा या सज्ज होतात. अलर्टवर जातात. आजचा हा मेल सकाळी 10.12 मिनिटांनी प्राप्त झाला आहे. त्यानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर गेल्या आहेत.
दरम्यान, संपूर्ण महापौर कार्यलयातली सुरक्षा यंत्रणा ही कडेकोट करण्यात आली आहे. तत्काळ बॉम्ब नाशक पथकाकडून तपासणी करण्यात आली, पण कुठेही काहीही संशयास्पद काहीही आढळलं नाही, त्यामुळे कार्यालयात रुटीन कामकाज सुरु आहे. पण मेलमध्ये खलिस्तान बोलेगा मुंबई जिंदाबाद असा मजकुर लिहण्यात आला आहे.
त्यामुळे आता सुरक्षा यंत्रणा, मुंबई महापालिका कार्यालयातील चौकशी, तपासणी करण्यासाठी अलर्टवर आहे. आणि पथकं लक्ष ठेवून आहेत. पुढे हा धमकीचा मेल नेमका कुठून आला आहे. त्याचा तपास करणं आणि आरोपींना पकडणं हे मुंबई पोलिस आणि तपास यंत्रणांपुढील आव्हान आहे.