मुंबई लोकलच्या दारावर युवकाने डोकं टेकवलं! आनंद महिंद्राही भावूक

| Updated on: Feb 03, 2021 | 9:14 PM

'हा भारताचा आत्मा आहे. मी प्रार्थना करतो की आपल्यापासून ही गोष्ट कधीही दुरावणार नाही', अशा शब्दात आनंद महिंद्रा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मुंबई लोकलच्या दारावर युवकाने डोकं टेकवलं! आनंद महिंद्राही भावूक
Follow us on

मुंबई : सर्वसामान्य मुंबईकरांसाठी मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल 1 फेब्रुवारीपासून सुरु करण्यात आली आहे. अशावेळी खूप दिवसांनी लोकल प्रवासाचा योग आलेल्या एका युवकाने लोकलच्या दारावर आपला माथा टेकवला. हा फोटो आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही हा फोटो ट्वीट केलाय. ‘हा भारताचा आत्मा आहे. मी प्रार्थना करतो की आपल्यापासून ही गोष्ट कधीही दुरावणार नाही’, अशा शब्दात आनंद महिंद्रा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.(Emotional post by Anand Mahindra about Mumbai Local)

आनंद महिंद्रांचं ट्वीट

कोरोना महामारीमुळे सर्वसामान्य मुंबईकरांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली नव्हती. आता 1 फेब्रुवारीपासून राज्य सरकारने सर्वांनाच प्रवासाची मुभा दिली आहे. मात्र, लोक पहिल्याप्रमाणे नाही पण सरकारने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे प्रवास करत आहेत. अशावेळी व्हायरल होणारा हा फोटो पाहून सर्वसामान्य मुंबईकर चांगलाच भावूक होताना दिसत आहे. आनंद महिंद्रा यांनीही ट्विटरवर भावनिक पोस्ट केली आहे.

मुंबईकरांची जीवनवाहिनी

लोकल ही मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे. त्यामुळे हा फोटो पाहून कुणीही मुंबईकर भावूक झाल्याशिवाय राहणार नाही. लोकच्या माध्यमातूनच प्रवास करुन सामान्य मुंबईकर आपल्या कामाचं ठिकाण गाठत असतो. पण कोरोनामुळे अनेकांचा रोजगारच हिरावला गेला आहे. तर अनेकांच्या रोजंदारीवर गदा आली आहे. आता लोकल सुरु झाल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर येण्यास मदत होऊ शकते. दरम्यान, जेव्हा कुठल्या तांत्रिक कारणामुळे लोकल बंद पडते तेव्हा मुंबईच ठप्प झाल्याचा भास निर्माण होतो.

एका ट्विटर युजरने लिहिलं आहे की, ‘एक क्लिक ज्याने माझं मन जिंकलं. 11 महिन्यानंतर लोकल प्रवास करण्यापूर्वी एक व्यक्ती लोकलची पूजा करत आहे’. आनंत महिंद्रा यांनी याला रिट्वीट करत, हा भारताचा आत्मा आहे. मी प्रार्थना करतो की आपल्यापासून ही गोष्ट कधीही दुरावणार नाही’, असं लिहिलं आहे.

दिलेल्या वेळतच प्रवास करा, नाहीतर…

दिलेल्या वेळेशिवाय कुणी सर्वसामान्य नागरिक लोकल प्रवास करताना आढळून आला तर त्याला 200 रुपये दंड आणि एक महिन्याचा तुरुंगवास भोगावा लागू शकतो. त्यामुळे सर्वसामान्यांना विशिष्ट वेळेतच प्रवास करावा लागणार आहे. रेल्वे स्थानकातील तिकीट खिडक्यांवरील गर्दी टाळण्यासाठी वेळेपूर्वी सामान्यांना तिकीट देण्यात येईल, अशी भूमिका रेल्वे प्रशासनानं घेतली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी लोकल प्रवास करताना वेळेची मर्यादा पाळणं अत्यंत गरजेचं बनलं आहे.

लोकल प्रवासाच्या वेळा कोणत्या?

सर्व प्रवाशांना सकाळच्या पहिल्या लोकलपासून सकाळी 7 वाजेपर्यंत तसेच दुपारी 12 पासून दुपारी 4 पर्यंत आणि रात्री 9 पासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करता येईल. सर्वसामान्य प्रवाशांना सकाळी 7 ते दुपारी 12 व दुपारी 4 ते रात्री 9 या कालावधीत उपनगरीय रेल्वे सेवांत प्रवास करता येणार नाही. या वेळात फक्त यापूर्वी परवानगी देण्यात आलेल्या विशिष्ट प्रवर्गातील प्रवासी प्रवास करू शकतील.

संबंधित बातम्या :

Mumbai night life : मुंबईत लवकरच पुन्हा नाईट लाईफ, आदित्य ठाकरेंची घोषणा

Mumbai Local : सर्वसामान्यांसाठी मुंबई लोकल सुरु, तिकीट काऊंटरवर प्रवाशांची लगबग

Mumbai Local : मुंबईकरांनो लोकल प्रवास करताना वेळ पाळा, नाहीतर तुरुंगात जाल!

Emotional post by Anand Mahindra about Mumbai Local