अनिल देशमुख यांचे चिरंजीव, सलिल देशमुख यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मोठा दिलासा

| Updated on: Nov 01, 2022 | 9:31 PM

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा सलिल देशमुख यांना मोठा दिलासा मिळाला आहे

अनिल देशमुख यांचे चिरंजीव, सलिल देशमुख यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मोठा दिलासा
सलिल देशमुख आणि अनिल देशमुख यांचा फाईल फोटो
Follow us on

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा सलिल देशमुख यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सलिल देशमुख यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी जामीन मंजूर झालाय. मुंबई सेशन कोर्टाकडून सलिल देशमुखांना दिलासा मिळाला आहे. कोर्टाने देशमुखांना 3 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.

सलिल यांना जामीन मिळाल्यानंतर कोर्टात त्यांची बाजू मांडणारे वकील अनिकेत निकम यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. “आम्ही आज त्यांचा सीआरपीसी कलम 88 अन्वये अर्ज दाखल केला. ईडीने सलिल यांना जरी आरोपी ठरवलं असेल तरी अद्यापर्यंत त्यांच्यावर अटकेची कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही”, असं अनिकेत निकम म्हणाले.

“सलिल यांनी तपासात सहकार्य केलेलं आहे. त्यांना जेव्हा ईडीकडून समन्स बजावण्यात आले तेव्हा ते ईडी कार्यालयात दाखल झालेत. ईडीने मागितलेले सर्व कागदपत्रे त्यांनी सादर केले आहेत. त्यानंतर त्यांच्यावर ईडीची कारवाई झालेली नाही. कस्टडीची आवश्यकता नाही. त्यामुळे त्यांना अटी-शर्ती अधीन ठेवून मुक्त करण्यात यावी, अशी मागणी अर्जाद्वारे केली”, अशी माहिती सलिल देशमुख यांचे वकील अनिकेत निकम यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी महाविकास आघाडीचं सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे तत्कालीन पोलीस आयुक्तांना पत्र पाठवत मोठा लेटर बॉम्ब टाकला होता.

अनिल देशमुख यांनी निलंबित एपीआय सचिन वाझेला महिन्याला 100 कोटींच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असा आरोप परमबीर सिंह यांनी केला होता. या आरोपांनंतर ईडीने कारवाई केली होती.

या कारवाईत अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या दोन सचिवांना देखील अटक झाली होती. तसेच सचिन वाझेला देखील अटक करण्यात आली होती. याच प्रकरणी ईडीने सलिल देशमुख यांनादेखील आरोपी ठरवलं आहे. ईडीचा सध्या या प्रकरणी तपास सुरु आहे.