Anil Parab : शिवसैनिक म्हाडाच्या ऑफिसमध्ये घुसले, अनिल परब किरीट सोमय्या वाद पेटला

किरीट सोमय्या यांना बीकेसी पोलिसांनी अडवू नये, शिवसैनिक त्यांना त्यांच्या स्टाईलमध्ये उत्तर देतील असं वक्तव्य अनिल परब यांनी केलं आहे.

Anil Parab : शिवसैनिक म्हाडाच्या ऑफिसमध्ये घुसले, अनिल परब किरीट सोमय्या वाद पेटला
bkc mhada office
Image Credit source: tv9marathi
| Updated on: Jan 31, 2023 | 1:11 PM

दिनेश दुखंडे, मुंबई : शिवसैनिक म्हाडाच्या बीकेसीतील (Shivsainik mhada bkc) कार्यालयात घुसले आहेत. अनिल परबांच्या (ANIL PARAB) कार्यालयावरुन यांना जाब विचारणार असल्याची प्राथमिक माहिती समजली आहे. बांद्रा येथील म्हाडा वसाहतीमध्यचे शिवसेना आमदार अनिल परब यांच्या कार्यालयाच्या पाडकामाच्या मुद्द्यावरुन राजकारण चांगलचं तापलं आहे. विशेष म्हणजे ज्या कार्यालयाचं बांधकाम आज पाडण्यात आलं, तिथं अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेतल्यापासून महाराष्ट्रातील (maharashtra politics) राजकारण चांगलचं तापलं आहे.

आज अनिल परब यांनी जिथं बांधकाम पाडण्यात आलं तिथून पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी किरीट सोमय्या यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. त्याचबरोबर भाजपचे नेते किरीट सोमय्या अनिल परब यांचे बांधकाम पाडण्यातं तिथ पाहणी करण्यासाठी निघाले होते. बीकेसी पोलिसांनी त्या ठिकाणी जाण्यापासून रोकलं त्यामुळे राजकारणात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

किरीट सोमय्या यांना बीकेसी पोलिसांनी अडवू नये, शिवसैनिक त्यांना त्यांच्या स्टाईलमध्ये उत्तर देतील असं वक्तव्य अनिल परब यांनी केलं आहे.