अन्वय नाईक आत्महत्येची चौकशी क्लोज करणाऱ्यांची चौकशी व्हावी: अरविंद सावंत

| Updated on: Nov 05, 2020 | 7:59 PM

एखादी व्यक्ती पत्रकार असो किंवा अधिकारी असो किंवा आणखी कुणी सर्वांसाठी कायदा सारखा असतो, असं सावंत यांनी अर्णव गोस्वामी यांच्या अटकेसंदर्भात म्हटलं आहे. Arvind Sawant said investigation should be done who close Anvay Naike sucide case

अन्वय नाईक आत्महत्येची चौकशी क्लोज करणाऱ्यांची चौकशी व्हावी: अरविंद सावंत
Follow us on

मुंबई: शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी रिपब्लिक टीव्हीचे पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्या अटकेसंदर्भात बोलताना देशातील कायदा सर्वांसाठी सारखा असल्याचे म्हटले आहे. एखादी व्यक्ती पत्रकार असो किंवा अधिकारी असो किंवा आणखी कुणी सर्वांसाठी कायदा सारखा असतो, असं सावंत यांनी अर्णव गोस्वामी यांच्या अटकेसंदर्भात म्हटलं आहे. अन्वय नाईक यांच्या केसमध्ये आधीच्या अधिका-यांनीही त्यांच्या परिवाराला मदत केली नाही. त्या अधिका-यांची चौकशी केली पाहिजे, म्हणजे यामागे दबाव कुणाचा होता हे समजेल, असं अरविंद म्हणाले. अन्वय नाईक यांच्या आत्महत्येची अगोदरची केस क्लोज कशी झाली, याची चौकशी चौकशी व्हायलाच पाहिजे, असंही अरविंद सावंत म्हणाले आहेत. (Arvind Sawant said investigation should be done who close Anvay Naike sucide case)

कांजूरमार्ग  मेट्रो कारशेड

महाराष्ट्र सरकारने मेट्रो कारशेड कांजूरमार्गच्या जागेवर बांधण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, केंद्र सरकारनं महाराष्ट्र सरकारला पत्र पाठवून ती जागा केंद्राची असल्याचा दावा केल्या त्यासोबत काजूरमार्गच्या जागेवर बोर्ड देखील लावत काम थांबवण्याची मागणी केली आहे.”कांजूरमार्गच्या जागेसंदर्भात केंद्र सरकारची राज्याशी संवाद साधण्याची जबाबदारी होती. आधीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही कांजूरमार्गची जमीन राज्य सरकारची असल्याचं प्रतिदज्ञापत्र दाखल केलं होतं. तेव्हा केंद्राला समजलं नाही की जमीन केंद्राची आहे,आताच कसं कळलं?, असा प्रश्न अरविंद सावंत यांनी उपस्थित केला आहे.

शिवेसना एनडीएमध्ये होती तेव्हाही आरेमधील मेट्रो कारशेडला शिवेसनेने विरोध केला होता. आता जर मेट्रोचं काम रखडत असेल तर याचं पाप जे कांजूरमार्ग कारशेडला विरोध करत आहेत, त्यांचं आहे, अशी टीका अरविंद सावंत यांनी भाजपवर केली.

दरम्यान, महाराष्ट्रात आजपासून नाट्यगृह सुरु झाली आहेत. राज्य सरकारचं पुढचं पाऊल मंदीरं खुली करण्याचं असेल, असं अरविंद सावंत यांनी स्पष्ट केलं. मंदीर उघडणार आहोत पण थोडं थांबा, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याची माहिती सावंत यांनी दिली.

महिला व बालकल्याण विकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या विरोधात भाजप आंदोलन करतंय.जर यशोमती ठाकूरांच्या राजीनाम्याची मागणी करत असाल तर मागच्या सरकारमध्येही चिक्की घोटाळा झाला होता. त्यावेशी राजीनामे का घेतले नाहीत, असा सवाल अरविंद सावंत यांनी भाजपला विचारला.

संबंधित बातम्या :

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरोधकांना सडेतोड उत्तर देतील: अरविंद सावंत

Arnab Goswami| हरिश साळवे म्हणाले, अर्णवला जामीन दिल्यास आभाळ कोसळेल का? कोर्टात काय काय घडलं?

(Arvind Sawant said investigation should be done who close Anvay Naike sucide case)