‘तुझ्या एका सेल्फीमुळे आपले 18 कोटी पाण्यात गेले’, आर्यन खान-गोसावी सेल्फीवर मोठा दावा

| Updated on: Nov 07, 2021 | 10:21 AM

आर्यन खान ड्रग्ज केस प्रकरणी पूजा ददलानी, के पी गोसावी, सॅम डिसुझा, मनिष भानुशाली आणि सुनील पाटील यांच्यात डिल झाली. मात्र आर्यन खानसोबत के पी गोसावीने काढलेल्या सेल्फीमुळे सर्व गेम फसला. यामुळे डिलचा मास्टरमाइंड सुनील पाटील केपी गोसावीवर भडकला, असा खुलासा आर्यन खान प्रकरणातील महत्त्वाचा साक्षीदार विजय पगारे यांनी केला आहे.

तुझ्या एका सेल्फीमुळे आपले 18 कोटी पाण्यात गेले, आर्यन खान-गोसावी सेल्फीवर मोठा दावा
आर्यन खान, केपी गोसावी आणि विजय पगारे
Follow us on

मुंबई :  क्रूझ ड्रग पार्टीवर 2 ऑक्टोबर रोजी कारवाई करत आर्यन खानला अटक करण्यात आली होती. आर्यनला ताब्यात घेतल्यानंतर त्याचे काही फोटो व्हायरल झाले होते. त्यापैकी एका फोटोत आर्यन एका कथित एनसीबी अधिकाऱ्यासोबत दिसत होता. तो कथित अधिकारी के पी गोसावी होता. के पी गोसावीच्या या सेल्फी फोटोमुळेच संपूर्ण गेम फसल्याचे सुनील पाटील के पी गोसावीला बोलत होता. तुझ्या एका सेल्फीमुळे आपले 18 कोटी पाण्यात गेले, असं सुनील पाटील मोठमोठ्याने गोसावीवर चिडून बोलत होता, असा गौप्यस्फोट आर्यन खान प्रकरणातील महत्त्वाचा साक्षीदार विजय पगारेंनी केला आहे.

तुझ्या सेल्फीमुळे आणि तुझ्या चरबीमुळे संपूर्ण डील फेल झाली. तुला सेल्फीची चरबी चढली होती. तुझ्या सेल्फीमुळे आपले 18 कोटी गेले. माझे काय हाल झालेत, मी काय भिकारी झालो. माझ्या समोर देणेकरी बसलेत. मला पैसे द्यायचे आहेत. तुझ्यामुळे सेल्फीमुळे संपूर्ण डिल कॅन्सल झाली, असं सुनील पाटील हे केपी गोसावीला बोलत होते, असा खुलासा विजय पगारे यांनी केला आहे.

डीलबद्दल विजय पगारे यांनी काय काय खुलासे केले?

केपी गोसावीला 50 लाख मिळाले होते. डील शंभर टक्के झाली होती. पैसे हवाला झाले होते. हवाला झालेले पैसे परत गेले असंही सुनील म्हणाला होता. पण 50 लाख अॅडव्हान्स मिळाले होते. साडे सतरा कोटी हवाला झाले होते. पण ते परत गेले. हे वाक्य सुनील पाटील मला बोलला. सॅम डिसुझाचा पैशासाठी सुनील पाटीलला फोन येत होता. मेहूलही त्यांच्याशी बोलत होता. त्यांचं संभाषण व्हाईस कॉलवरूनच सुरू होतं. ते साध्या कॉलवरुन कधी बोलले नाही, असं पगारे म्हणाले.

सॅम डिसुझा, मेहूल पैसे रिर्टनसाठी पाटीलवर प्रेशर टाकत होते

सुनील पाटीलने 5 तारखेला मला तो विषय सांगितला. ते केपी गोसावीबरोबर बोलत होते. केपी पैसे परत कर म्हणून सांगत होते. केपी म्हणाले, माझ्याकडून काही पैसे खर्च झाले. 38 लाख पाठवून दिले. चार पाच लाखाची व्यवस्था करतोय, ते पाठवून देतो असं केपी गोसावी म्हणाले. सुनील संतापून बोलत होते. तुझ्यामुळे सेल्फीमुळे संपूर्ण डिल कॅन्सल झाली. सॅम डिसुझा आणि मेहूल पैसे रिर्टनसाठी सुनील पाटीलवर प्रेशर टाकत होते. त्यावेळी मी त्यांच्यासमोरच बसलेलो होतो. हे संभाषण सुरू असताना सुनील पाटील अधूनमधून रडलाही होता. पूजा मॅडम, सॅम डिसुझा आणि मेहूल यांच्यामुळे ही गडबड झाल्याचं ते बोलत होते.

पाटील सोबत असल्याने भानुशाली आणि गोसावीशी ओळख

सुनील पाटील आणि मी एकाच गावचा आहे. पाटील सोबत असल्याने भानुशाली आणि गोसावीशी ओळख झाली. कारण त्यांचं सुनील पाटीलकडे येणं जाणं होतं. केपी गोसावी हा भारताचा गुप्तहेर असल्याचं मला सुनील पाटील यांनी सांगितलं होतं. अहमदाबादला इलूगया होटेलला त्यांनी माझी केपी गोसावी गुप्तहेर असल्याची ओळख करून दिली. गोसावी काहीही करू शकत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे मी गोसावीला त्या दिवसापासून मान सन्मान देत होतो.

हे ही वाचा :

सेल्फीमुळे गेम फसला, कुणा कुणात झाली होती डील?; विजय पगारेंनी सांगितली आँखो देखी

तुझ्या सेल्फीच्या चरबीमुळे डील फसली, सुनील पाटील केपी गोसावीवर भडकला; विजय पगारेंचा दावा