वा रे मर्दा…! राष्ट्रवादीसोबतचा संसार सर्वात मोठा नेभळटपणा नाही काय?; आशिष शेलार यांचा ठाकरे गटावर हल्लाबोल

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वातंत्र्य लढ्यात योगदान काय? हा प्रश्न विचारणे म्हणजे तुम्हाला मर्दानगी वाटते काय? वा रे मर्दा..!

वा रे मर्दा...! राष्ट्रवादीसोबतचा संसार सर्वात मोठा नेभळटपणा नाही काय?; आशिष शेलार यांचा ठाकरे गटावर हल्लाबोल
वा रे मर्दा...! राष्ट्रवादीसोबतचा संसार सर्वात मोठा नेभळटपणा नाही काय?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 05, 2022 | 10:58 AM

मुंबई: आजच्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून भाजपचे नेते आशिष शेलार यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. कानडी मुख्यमंत्री सीमाभागासाठी लढतात, महाराष्ट्रांच्या गावांवरही दावा ठोकतात. इथे महाराष्ट्र सरकारचे शेलारमामा नेभळटासारखे फक्त अरे ला कारे बोलत आहेत, असा हल्ला अग्रलेखातून करण्यात आला होता. सामनातील ही टीका आशिष शेलार यांना चांगलीच झोंबली आहे. शेलार यांनी एक पत्रक काढून शिवसेनेचा चांगलाच समाचार घेतला आहे. राष्ट्रवादीसोबतचा संसार सर्वात मोठा नेभळटपणा नव्हता काय? असा सवाल करतानाच शिवसेनेच्या आजवरच्या नेभळटपणावर बोट ठेवत वा रे मर्दा, असा खोचक टोलाच शेलार यांनी शिवसेनेला लगावला आहे.

हे सुद्धा वाचा

आशिष शेलार यांचं पत्र जसंच्या तसं

विरोधी पक्षाने नरसिंह होऊन खोके सरकारचा अंत करायला हवा, अशी “मर्दानी” हाक आज सामनाच्या अग्रलेखातून दिली आणि “कर्नाटकने आरे केले तर आम्ही कारे करु” हा महाराष्ट्राने दिलेला इशारा यांनी नेभळट ठरवला… वा रे मर्दा..!

मुळात विरोधी पक्षाने नरसिंह अवतार धारण करण्यासाठी, या अवताराला बोलावण्यासाठी एका “प्रामाणिक” भक्त प्रल्हादाची गरज असते ना हो कार्यकारी संपादक महोदय…! तुमच्याकडे नारायण..नारायण जप करणारा भक्त प्रल्हाद आहे का? तुमच्याकडे आता भक्तप्रल्हाद ही नाही, नारायण ही नाही. आणि हो, तुमच्यात आता रामच उरलेला नाही. आठवते का? कधी काळी राम मंदिर आणि राम वर्गणीची खिल्ली उडवली होतीस ना रे मर्दा? आता भक्तप्रल्हाद होऊ पाहताय? वा रे मर्दा!

कर्नाटकला महाराष्ट्र जशास तसे उत्तर देईल… आरेला कारे करेल… हा इशारा तुम्हाला नेभळट वाटतो काय? मग राहुल गांधी आणि त्यांची काँग्रेस स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकररांना समलैंगिक म्हणते तेव्हा तुम्ही करता तो काय? मर्दानी बाणा असतो काय? वा रे मर्दा वा!

तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वशंजाकडे पुरावे मागता, तो काय तुमचा मर्दपणा होता का?

प्रभू राम झालाच नाही… भगवत गीता जिहाद शिकवते असे महान जावई शोध लावणाऱ्या काँग्रेस सोबत इलूइलू जे तुमचे सुरु आहे, ती मर्दानगी आहे का? अहो महाराष्ट्रातील श्रध्दा वालकर नावाच्या लेकीचे 35 तुकडे केले जातात तेव्हा जो पक्ष साधी हळहळ सुध्दा व्यक्त करीत नाही ना, त्याला नेभळटपणा म्हणतात…

देशाचे तुकडे करायला निघालेल्या पीएफआयवर आमच्या सरकारने बंदी घातल्यानंतर त्याचे साधे समर्थन ही न करणे हे नेभळटपणाचे लक्षण नाही का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वातंत्र्य लढ्यात योगदान काय? हा प्रश्न विचारणे म्हणजे तुम्हाला मर्दानगी वाटते काय? वा रे मर्दा..!

वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जे अभिवादन करायला तयार नाहीत, अशा काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत तडजोडीचा संसार हाच सगळ्यात मोठा नेभळटपणा नाही का?

काश्मीर मधून 370 हटवणे, अयोध्येत राम मंदिर बांधणे ही मर्दानी कामे आहेत संपादक महोदय…

आम्हाला, होय… होय आम्ही मर्द आहोत..असे होर्डिंग लावावे लागत नाही… भाजपाने करुन दाखवलंय… मनगटात ज्यांच्या जोर असतो तेच मर्दानगी करु शकतात.

उरला प्रश्न वंदनीय शेलारमामांचा…अहो तुमचे फुसके कर्तृत्व सिध्द करायला तुम्ही काय करताय? छत्रपती शिवाजी महाराज यांचे निष्ठावंत पराक्रमी मावळे अशी ओळख असलेल्या शेलारमांमाना तुम्ही नेभळट म्हणताय की काय? वा रे मर्दा!

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.