प्रबोधनकारांच्या ग्रंथ प्रकाशनाला राज ठाकरेंना बोलवा, संस्मरणीय सोहळा महाराष्ट्र पाहिलं, आशिष शेलारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

| Updated on: Oct 15, 2021 | 2:39 PM

प्रबोधनकारांच्या विचारांचा व्यासंग आणि वारसा असणारे राज ठाकरे यांनाही या कार्यक्रमाला बोलावून एक चांगला संदेश देता आला असता, असं आशिष शेलार म्हणाले आहेत.

प्रबोधनकारांच्या ग्रंथ प्रकाशनाला राज ठाकरेंना बोलवा, संस्मरणीय सोहळा महाराष्ट्र पाहिलं, आशिष शेलारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
आशिष शेलार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us on

मुंबई: भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. ‘प्रबोधनमधील प्रबोधनकार’ या ग्रंथ प्रकल्पाबद्दल सरकारचं अभिनंदन करतो, असं शेलार यांनी म्हटलंय. मात्र, या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेत्यांना बोलावल असत तर अधिक आनंद झाला असतं. याच बरोबर प्रबोधनकारांच्या विचारांचा व्यासंग आणि वारसा असणारे राज ठाकरे यांनाही या कार्यक्रमाला बोलावून एक चांगला संदेश देता आला असता, असं आशिष शेलार म्हणाले आहेत.

ज्या ज्या वेळी राज ठाकरे यांना भेटत असतो त्या त्या वेळी प्रबोधनकारांचे ज्याज्वल्य विचार त्यांच्या तोंडून ऐकले आहेत. अद्यापही या कार्यक्रमाच निमंत्रण त्यांना देता येईल. या व्यासपीठावर राज ठाकरे आले तर एक संस्मरणीय सोहळा महाराष्ट्राला पाहता येईल, असं मत आशिष शेलार यांनी मांडलं आहे.

प्रबोधनमधील प्रबोधनकार या ग्रंथ प्रकाशनावरून नाराजीनाट्य रंगण्याची सुरूवात झाली आहे. विरोधीपक्ष नेत्याला निमंत्रण नाही ते ठिकय पण किमान प्रबोधनकारांच्या विचारांचा वारसा आणि व्यासंग असणाऱ्या राज ठाकरे यांना बोलवायला हवं, असं आशिष शेलार म्हणाले.

आशिष शेलार यांचं पत्र जसंच्या तसं

प्रति,

मा. उध्दवजी ठाकरे,

महाराष्ट्र राज्य.

मुख्यमंत्री

विषय “प्रबोधनमधील प्रबोधनकार” या प्रकाशनाच्या कार्यक्रमा बाबत

महोदय,

महाराष्ट्र शासनाच्या साहित्य संस्कृती महामंडळ आणि मराठी भाषा विभागातर्फे “प्रबोधन मधील प्रबोधनकार” या ग्रंथ प्रकल्पाची निर्मिती करून महाराष्ट्राच्या अमुल्य साहित्य जतनामध्ये मोठी भर पडेल असा उपक्रम हाती घेतल्याबद्दल शासनाचे आणि आपले आभार. नव्या पिढीसमोर प्रबोधनकारांचे विचार आणणे ते पोहचवणे ही काळाजी गरजच असून शासनाने हाती घेतलेल्या या उपक्रमातून महाराष्ट्राचा अनमोल ठेवा वाचकांना खुला होणार आहे याबद्दल मनस्वी आनंदच झाला. या ग्रंथाचे प्रकाशन आणि स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारक संकेतस्थळाचे लोकार्पण दि. 16 ऑक्टोबरला होत असल्याचे आज शासनाने जाहीर केले आहे. प्रथेप्रमाणे या कार्यक्रमात विरोधीपक्षनेत्यांही आमंत्रित केले असते तर अधिकच आनंद झाला असता पण असो..

मला या निमित्ताने एक नम्रपणे शासनाला सुचना अथवा विनंती करावीशी वाटली त्यासाठी हा पत्रव्यवहार करीत आहे. प्रबोधनकारांच्या विचारांचा वारसा आणि व्यासंग असलेले, त्यांचे नातू मा. श्री. राज ठाकरे यांना या कार्यक्रमला राजशिष्टाचारानुसार आमंत्रित करुन एक चांगला संदेश शासनाला देता आला असता अथवा देता येऊ शकतो. अर्थात त्यांनी आमंत्रण स्वीकारावे की नाही हा सर्वस्वी त्यांचा निर्णय असेल. पण ज्या ज्या वेळी त्यांना भेटलो त्या त्या वेळी त्यांच्या तोंडून प्रबोधनकारांचे जाज्वल्य विचार ऐकले आहेत. त्यावर त्यांचे असलेले नितांत प्रेम, आदर आणि व्यासंग मी अनुभवला आहे. त्यामुळे अशा व्यासपीठावर आपल्या सोबत तेही असतील तर एक संस्मरणीय सोहळा महाराष्ट्राला पाहता येईल. तसेच या कार्यक्रमात प्रबोधनकारांचे पणतू राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे यांसह कुटुंबातील सदस्यांचाही यथोचित सन्मान व्हावा.

एरवी महाराष्ट्राचे प्रश्न आणि राजकीय मुद्द्यांवर आपण बोलत असतोच. या कार्यक्रमाच्या बाबतीत तो अभिनिवेश मनात न ठेवता एक विनंती, सूचना अथवा मागणी करावीशी वाटली त्यासाठी केलेला हा प्रयत्न.

आपला

अॅड. आशिष शेलार

इतर बातम्या :

कामठीत लवकरच बुद्धिस्ट थीम पार्कचा प्रकल्प राबवू; देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

Dhammachakra Pravartan Din 2021 | डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसोबत तब्बल 3 लाख लोकांनी बौद्ध धम्म स्वीकारला, त्या दिवशी नागपुरात नेमंक काय घडलं ?

Ashish Shelar wrote letter to Uddhav Thackeray to gave invitation to Raj Thackeray