मुंबई हादरली! डी कंपनीचा हस्तक आसिफ दाढीच्या मुलावर गोळीबार
मुंबईतून मोठी बातमी समोर येत आहे, डी कंपनीचा हस्तक आसिफ दाढीच्या मुलावर गोळीबार करण्यात आला आहे. डोक्यार्ड रोड परिसरात गोळीबार झाल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबईतून मोठी बातमी समोर येत आहे, डी कंपनीचा हस्तक आसिफ दाढीच्या मुलावर गोळीबार करण्यात आला आहे. डोक्यार्ड रोड परिसरात गोळीबार झाल्याची माहिती समोर येत आहे. मांडीला गोळी लागल्याने आसिफ दाढीचा मुलगा समीर शेख जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच भायखळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेनं मुंबई शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, डी कंपनीचा हस्तक आसिफ दाढीच्या मुलावर गोळीबार करण्यात आला आहे, या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे. आसिफ दाढीचा मुलगा समीर शेख याच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. मुंबईच्या डोक्यार्ड रोड परिसरात ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. आसीफ दाढीचा मुलगा समीर शेख याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला, या हल्ल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले आहेत. समीर शेख याच्या मांडीला गोळी लागल्याने त्याला उपचारासाठी जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान घटनेची माहिती मिळताच भायखळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
हल्ल्याचं कारण अस्पष्ट
आसिफ दाढीच्या मुलावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. समीर शेख याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. या घटनेत समीर शेख जखमी झाला आहे. त्याच्या मांडीला गोळी लागली आहे. मात्र समीर शेख याच्यावर नेमका गोळीबार का करण्यात आला? गोळीबाराचं नेमकं कारण काय होतं? हे अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेमुळे घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला होता. पोलिसांकडू हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.
विरारमध्ये दगडाने ठेचून एकाची हत्या
दरम्यान दुसरीकडे विरारमध्ये देखील एक अशीच घटना समोर आली आहे. विरारमध्ये भरदिवसा एका आरटीआय कार्यकर्त्याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. या घटनेनं शहर हादरलं आहे. आत्माराम पाटील असं मृत व्यक्तीचं नाव आहे.