आणि भास्कर जाधवांनी स्वत:चा शब्द मागे घेतला, अंगविक्षेपही मागे घेतला, सभागृहात नेमकं काय घडलं?

| Updated on: Dec 22, 2021 | 3:41 PM

विधानसभा अधिवेशनात आज पंतप्रधानांची नक्कल करण्यावरून मोठा गोंधळ उडाला. आमदार भास्कर जाधव यांनी बोलताना नरेंद्र मोदी यांची काही वाक्ये हिंदीत, नक्कल करून बोलली. त्यानंतर विधानसभेत एकच घोषणाबाजी सुरु झाली.

आणि भास्कर जाधवांनी स्वत:चा शब्द मागे घेतला, अंगविक्षेपही मागे घेतला, सभागृहात नेमकं काय घडलं?
महाराष्ट्र विधानसभा 2021
Follow us on

मुंबईः विधानसभा अधिवेशनात आज पंतप्रधानांची नक्कल करण्यावरून मोठा गोंधळ उडाला. आमदार भास्कर जाधव यांनी बोलताना नरेंद्र मोदी यांची काही वाक्ये हिंदीत, नक्कल करून बोलली. त्यानंतर विधानसभेत एकच घोषणाबाजी सुरु झाली. देशाच्या पंतप्रधानांची या सभागृहात नक्कल करणे, हे शोभनीय वक्तव्य नाही. भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी जाहीर माफी मागावी किंवा त्यांना तत्काळ निलंबित करण्यात यावं, अशी मागणी विरोधकांनी केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भास्कर जाधव यांचं तत्काळ निलंबन करण्यात यावं, अशी मागणी केली.

काय म्हणाले भास्कर जाधव?

विधानसभेत नितीन राऊत यांनी एका विषयासंबंधी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा बाहेर काढू, नागरिकांना 15-15 लाख रुपये देऊ असं आश्वासन दिलं होतं, असं वक्तव्य केलं. मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या विधानाला आक्षेप घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असं आश्वासन कधीही दिलच नव्हतं, असा दावा फडणवीस यांनी केला. या लक्षवेधीशी पंतप्रधानांचा संबंध नसतानाही तो विषय काढणं हे आम्ही सहन करणार नाहीत.” अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यानंतर आमदार भास्कर जाधव उभे राहिले आणि म्हणाले, 2014 साली देशाचे पंतप्रधान होण्यापूर्वी नरेंद्र मोदी म्हणले, ‘काला धन लाने का है की नही लाने का… लाने का… लाने का है तो कहाँ रखने का.. यु ही रखने का.. ‘. अशा प्रकारे नक्कल करताना त्यांनी अंगविक्षेपही केला.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आक्रमक

भास्कर जाधवांनी सभागृहात पंतप्रधानांची नक्कल केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं तत्काळ निलंबन करण्याची मागणी केली. सभागृहात भास्कर जाधव यांना निलंबित करा, अशा घोषणा सुरु झाल्या. देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘सभागृहात देशाच्या पंतप्रधानांची नक्कल सहन केली जाणार नाही. ‘ अंगविक्षेप करतायत ते सहन केलं जाणार आहे का, ही पद्धत आहे का सभागृहाची? अंगविक्षेप करून भास्कर जाधव जे बोलतायत हे शोभनीय नाही. हे चालत नाही. आम्ही यांच्या नेत्यांचीही अशाच प्रकारे नक्कल केली. हे चालेल का सभागृहाला? त्यांनी माफी मागितली पाहिजे, अध्यक्ष महोदय.”

भास्कर जाधव यांनी मागितली माफी

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृह स्थगित करण्याची मागणी केली. त्यानंतर भास्कर जाधव यांनी उभे राहून, या सर्व प्रकरणावर माफी मागितली. पंतप्रधानांबद्दल केलेले वक्तव्य मी मागे घेतो, तसेच माझे अंगविक्षेपही मागे घेतो, असे ते म्हणाले.

इतर बातम्या-

अमृता फडणवीसांना विरोधी पक्षनेत्या करणार का? चंद्रकांत पाटलांवर पेडणेकर भडकल्या, रश्मी ठाकरेंवरच्या प्रश्नाला उत्तर

VIDEO | भाजप आमदार मोनिका राजळेंचे चौकार-षटकार, कॉलेज टीमची कॅप्टन 28 वर्षांनंतर पुन्हा मैदानात