VIDEO | भाजप आमदार मोनिका राजळेंचे चौकार-षटकार, कॉलेज टीमची कॅप्टन 28 वर्षांनंतर पुन्हा मैदानात

VIDEO | भाजप आमदार मोनिका राजळेंचे चौकार-षटकार, कॉलेज टीमची कॅप्टन 28 वर्षांनंतर पुन्हा मैदानात
भाजप आमदार मोनिका राजळे क्रिकेटच्या मैदानात

अहमदनगरमधील पाथर्डीत नगर परिषदेतर्फे एकदिवसीय भव्य क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजप आमदार मोनिका राजळे यांनी देखील या स्पर्धेत सहभाग घेतला होता.

कुणाल जायकर

| Edited By: अनिश बेंद्रे

Dec 22, 2021 | 11:23 AM

अहमदनगर : शेगाव-पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे (Monika Rajale) या अतिशय शांत स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. मात्र राजळेंचं वेगळंच रुप क्रिकेटच्या मैदानात पाहायला मिळालं. कॉलेज जीवनात क्रिकेट संघाचं नेतृत्व करणाऱ्या राजळे जवळपास 28 वर्षांनंतर पुन्हा मैदानात उतरल्या आणि त्यांनी गोलंदाजी-फलंदाजी केली. मोनिका राजळे या अहमदनगरमधून भाजपच्या आमदार आहेत.

मोनिका राजळेंची फलंदाजी

अहमदनगरमधील पाथर्डीत नगर परिषदेतर्फे एकदिवसीय भव्य क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजप आमदार मोनिका राजळे यांनी देखील या स्पर्धेत सहभाग घेतला होता. राजळे डॉक्टर इलेव्हन संघात सहभाग घेऊन क्रिकेटच्या मैदानात उतरल्या होत्या. यावेळी त्यांनी बॅटिंग आणि बॉलिंगसह मैदानात फिडिंग देखील केली.

विद्यापीठाच्या महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व

विशेष म्हणजे मोनिका राजळे यांनी त्यांच्या शैक्षणिक कालखंडात विद्यापीठाच्या महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते. 1993 नंतर बऱ्याच वर्षांच्या कालखंडाने पुन्हा एकदा मैदानात उतरत त्यांनी आपला आवडता खेळ खेळला.

जुन्या आठवणी जाग्या झाल्या

जनतेची कामं करत असताना, अनेक जण आपापल्या समस्या घेऊन येतात. मात्र दैनंदिन कामातून बाहेर येत मला तुमच्यामुळे खेळाचा आनंद घेता आला आणि माझ्या जीवनातील जुन्या आठवणी जाग्या झाल्या, अशा भावना राजळे यांनी व्यक्त केल्या.

घरीच राजकारणाचा वारसा

मोनिका राजळे यांच्या सासरीच राजकारणाचा वारसा होता. त्यांचे पती दिवंगत राजीव राजळे हे माजी आमदार होते. तर त्यांचे सासरे अप्पासाहेब राजळे सुद्धा माजी आमदार होते. त्यामुळे घरातच राजकीय वारसा त्यांना मिळालाहोता. विशेष म्हणजे तालुक्याच्या पहिल्या आमदार होण्याचा मानही त्यांच्याकडेच जातो. त्यामुळेच त्या सलग दुसऱ्यांदा विधानसभेवर निवडून येऊ शकल्या आहेत.

पतीच्या निधनानंतर खचल्या नाही

मोनिका राजळे यांचे पती राजीव राजळे यांनी राष्ट्रवादीकडून नगर दक्षिण मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती. राजळे हे उच्च शिक्षित आणि अभ्यासू आमदार म्हणून प्रसिद्ध होते. तसेच तरुणांमध्ये लोकप्रिय होते. राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे ते भाचे होते. मात्र, 2017 मध्ये त्यांचं निधन झालं. मात्र, पतीच्या निधनाने मोनिका राजळे खचून गेल्या नाहीत. त्यांनी सामाजिक कार्यात कोणताही खंड पडू दिला नाही.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

मतदारांच्या ‘कार्यसम्राट आमदार’; वाचा, कसा आहे मोनिका राजळेंचा राजकीय प्रवास!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें