शासकीय दिनदर्शिकेतून मराठी महिने काढून टाकण्यामागील बोलविते धनी आदित्य ठाकरे आहेत काय?; भाजपचा सवाल

| Updated on: Feb 27, 2021 | 4:27 PM

राज्यात सर्वत्र मराठी भाषा दिन उत्साहात साजरा होत असतानाच शासनाच्या दिनदर्शिकेतून मराठी महिनेच वगळण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. (atul bhatkhalkar slams aaditya thackeray over government calendar)

शासकीय दिनदर्शिकेतून मराठी महिने काढून टाकण्यामागील बोलविते धनी आदित्य ठाकरे आहेत काय?; भाजपचा सवाल
अतुल भातखळकर, आमदार, भाजप
Follow us on

मुंबई: राज्यात सर्वत्र मराठी भाषा दिन उत्साहात साजरा होत असतानाच शासनाच्या दिनदर्शिकेतून मराठी महिनेच वगळण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. ठाकरे सरकारला मराठी महिन्यांचाही तिरस्कार झाला आहे. या सरकारने शासकीय दिनदर्शिकेतून मराठी महिनेच काढून टाकले असून या मागील बोलविते धनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आहेत काय? असा सवाल भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. (atul bhatkhalkar slams aaditya thackeray over government calendar)

प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार अतुल भातखळकर यांनी हा सवाल केला आहे. आपल्या राजकीय स्वार्थासाठी प्रत्येक वेळी मराठीचा वापर करणाऱ्या ठाकरे सरकारने 2021च्या महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत दिनदर्शिकेतून मराठी महिनेच वगळून टाकले असून, सोनिया सेनेला आता मरठी महिन्यांचा सुद्धा तिरस्कार होत असल्याची टीका भातखळकर यांनी केली आहे.

पर्यटन विभागाची प्रसिद्धी

महाराष्ट्र शासनाकडून दरवर्षी अधिकृतपणे दिनदर्शिका प्रकाशित केली जाते, प्रत्येक वर्षी या दिनदर्शिकेत इंग्रजी महिन्यांसोबतच मराठी महिन्यांचा सुद्धा उल्लेख करण्याचा कायदा आहे. परंतु 2021 च्या दिनदर्शिकेत मराठी महिन्यांचा उल्लेखच गाळला गेला आहे. त्यातही धक्कादायक बाब म्हणजे शिवसेनेचे नेते सुभाष देसाई मंत्री असलेल्या उद्योग विभागाच्या संकल्पनेतून ही दिनदर्शिका तयार करण्यात आली असली तरीही यात पर्यटन विभागाची प्रसिद्धी करण्यात आली आहे, त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत दिनदर्शिकेतून मराठी महिने काढून टाकण्यामागील बोलविता धनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आहेत काय? असा असा सवालही त्यांनी केला आहे.

दिनदर्शिका तात्काळ मागे घ्या

मराठी शाळेत शिक्षण घेतले म्हणून मुंबई महानगरपालिकेत नोकरी नाकारणे, मराठी विद्यापीठ स्थापन करण्याला जाणीवपूर्वक उशीर करणे, मराठी शाळांमधील शिक्षक अतिरिक्त ठरविणे, मुंबईतील मराठी शाळा बंद करणे अशा अनेक प्रकारांमधून ठाकरे सरकारचे व शिवसेनेचे मराठी प्रेम किती बेगडी आहे हे स्पष्ट होते, असं सांगतानाच सरकारने ही दिनदर्शिका तात्काळ मागे घेऊन त्यात मराठी महिन्यांचा उल्लेख करूनच नव्याने दिनदर्शिका प्रकाशित करावी अन्यथा आगामी अधिवेशनात या विरोधात आवाज उठविण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. (atul bhatkhalkar slams aaditya thackeray over government calendar)

 

संबंधित बातम्या:

उद्धवजींना इशारा देतो, सोमवारच्या आत संजय राठोडांचा राजीनामा घेतला नाही, तर… : चंद्रकांत पाटील

‘चित्रा वाघ वाघीण का बनल्या?’, पूजा चव्हाण प्रकरणाची माजी IPS अधिकाऱ्याकडून चिरफाड!

LIVE | पूजा चव्हाण आत्महत्या की हत्या याबाबत आजूनही खुलासा नाही – चंद्रकांत पाटील

(atul bhatkhalkar slams aaditya thackeray over government calendar)