हृदयविकाराने मृत्यू, जवळ कोणीही नातेवाईक नाहीत, बॅचलर तरुणावर एकट्या पोलिसाकडून विधीवत अंत्यसंस्कार

कोरोनाच्या प्रादुर्भावादरम्यान विरारच्या खाकी वर्दीतील पोलिसातील माणुसकीचे दर्शन घडले आहे. एका तरुणाच्या मृतदेहावर या खाकी वर्दीतील पोलिसाने अंत्यसंस्कार केले.

हृदयविकाराने मृत्यू, जवळ कोणीही नातेवाईक नाहीत, बॅचलर तरुणावर एकट्या पोलिसाकडून विधीवत अंत्यसंस्कार
| Updated on: May 08, 2020 | 6:22 PM

वसई : कोरोनाच्या प्रादुर्भावादरम्यान विरारच्या खाकी वर्दीतील (Bachelor Youth Cremated By Police) पोलिसातील माणुसकीचे दर्शन घडले आहे. एका तरुणाच्या मृतदेहावर या खाकी वर्दीतील पोलिसाने अंत्यसंस्कार केले. विरार पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक सुभाष शिंदे यांनी कुठलंही नातं नसताना एका बॅचलर तरुणावर विधीवत अंत्यसंस्कार केले. अंत्यसंस्कारावेळी या तरुणाच्या नातेवाईकांना व्हिडीओ कॉल करुन त्याचे दर्शनही घडवले. पोलिसाच्या या कृतीने खाकी वर्दीतील माणुसकी काय असते हे (Bachelor Youth Cremated By Police) पुन्हा एकदा दिसून आलं.

विरार पूर्व फुलपाडा परिसरात राहणारे 42 वर्षीय प्रमोद खरे यांचे बुधवारी 6 मे रोजी त्यांच्या राहत्या घरात हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. प्रमोद खरे हे अविवाहित होते. विरारमध्ये ते एकटेच राहत असून इस्टेट एजन्सीचे काम करत होते. त्यांचे आई-वडील, भाऊ, बहीण हे दिल्ली आणि कोलकाता येथे राहतात. त्यांचे इथे कोणीच नातेवाईक नव्हते. पोलिसांनी त्यांच्या सर्व नातेवाईकांना संपर्क केला, पण लॉक डाऊनमुळे नातेवाईक कोणीही येऊ शकत नव्हते. खरे यांचा अंतविधी हा धार्मिक विधीवत व्हावा, अशी इच्छा त्यांच्या घरच्यांनी व्यक्त केली होती.

त्यामुळे पोलीस नाईक सुभाष शिंदे यांनी स्वत: सर्व खर्च करुन खरे यांच्यावर अंत्यसंस्कार केले. अंतविधी दरम्यान नातेवाईकांना व्हिडीओ कॉलिंग करुन खरे यांचे अंत्यदर्शनही घडवून आणले (Bachelor Youth Cremated By Police). तसेच, मृतदेहाची कुठेही हेळसांड न होऊ देता, स्वत:च नातेवाईक होत त्यांनी सर्व विधी पार पाडल्या.

विरार पश्चिमच्या विराटनगर येथे आज (8 मे) दुपारी 1 वाजता खरे यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. अंत्यसंस्काराच्या वेळी व्हिडीओ कॉलिंगदरम्यान नातेवाईकांना अश्रू अनावर झाले होते.

Bachelor Youth Cremated By Police

संबंधित बातम्या :

दारु मिळाल्यानंतर आनंद लुटला, खुशी-खुशीत एकमेकांना लाथा बुक्क्यांनी धुतला

औरंगाबाद, नवी मुंबई, वसई विरार महापालिका निवडणुका लांबणीवर, निवडणूक आयोगाचं नगरविकास खात्याला पत्र