धक्कादायक! बांद्र्यात 4 वर्षीय मुलीवर अत्याचार; ४० वर्षीय नराधमाचं विकृत कृत्य

Bandra Crime News: बांद्र्यात 4 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. निर्मल नगर पोलिसांकडून 40 वर्षीय संशयिताला अटक करण्यात आली आहे.

धक्कादायक! बांद्र्यात 4 वर्षीय मुलीवर अत्याचार; ४० वर्षीय नराधमाचं विकृत कृत्य
| Updated on: Sep 27, 2026 | 11:38 PM

मुंबईतील बांद्रा परिसरात चार वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी निर्मल नगर पोलिसांनी ४० वर्षीय संशयित आरोपीला अटक केली आहे. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. तसेच या घटनेमुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि संशयित आरोपी एकाच परिसरात राहत असल्याचे समोर आले आहे. बांद्र्यातील निर्मल नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या झोपडपट्टी परिसरात ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची बाब समोर आल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी तातडीने निर्मल नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला.

तपासादरम्यान पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले आणि त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. आरोपी आणि पीडित मुलगी एकाच परिसरात राहत असल्याने पोलिसांकडून या घटनेच्या पार्श्वभूमीचाही तपास केला जात आहे. चार वर्षीय मुलीवरील अत्याचाराच्या या गंभीर प्रकरणात पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी, संबंधित व्यक्तींची चौकशी तसेच उपलब्ध माहितीच्या आधारे पुढील तपास केला जात आहे. या प्रकरणातील नेमकी घटना कशी घडली, याबाबत पोलिसांकडून अधिक माहिती गोळा केली जात आहे.

अल्पवयीन मुलीशी संबंधित असल्याने या प्रकरणातील पीडितेची ओळख गोपनीय ठेवण्यात येत आहे. पोलिसांकडून प्रकरणातील सर्व बाबींची चौकशी केली जात असून संशयित आरोपीविरोधात कायदेशीर कारवाई सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणातील अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us