निवडणूक आयोगाच्या निकालानंतरही येणार मोठा ट्विस्ट, अजित पवार यांचा ‘तो’ सल्ला ठाकरे ऐकणार का?

| Updated on: Feb 17, 2023 | 9:35 PM

प्रिम कोर्टाने सांगितलं आहे की 21 फेब्रुवारीपासून दोघांचं म्हणणं ऐकून घेऊन काय असेल तो निर्णय देतील. असं असताना एवढी घाई का केली? पाहा अजित पवार नेमकं काय म्हणाले.

निवडणूक आयोगाच्या निकालानंतरही येणार मोठा ट्विस्ट, अजित पवार यांचा तो सल्ला ठाकरे ऐकणार का?
Follow us on

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षचिन्हाचा वाद निकाली काढला आहे. शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह  देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे. गेले दोन महिने दोन्ही गटांकडून पक्षाच्या नावासाठी आणि चिन्हासाठी कागदपत्रे देण्यात आली. अखेर आयोगाने निर्णय दिला असून शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण देत ठाकरे गटाला मोठा धक्का दिला. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. अशातच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेला निकाल हा अनपेक्षित आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे की 21 फेब्रुवारीपासून दोघांचं म्हणणं ऐकून घेऊन काय असेल तो निर्णय देतील. असं असताना एवढी घाई का केली?, हे कळायला मार्ग नाही. निवडणूक आयोगाने निकाल दिलेला असला तरी माझं असणं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे वरच्या कोर्टात जातील आणि त्यांच्याकडे न्याय मागतील. त्रयस्थ नागरिक म्हणून माझं मत आहे की, महाराष्ट्रातील शिवसैनिक हा जेव्हा निवडणूका लागतील तेव्हा त्यांच्याच पाठिशी उभा राहिल आणि त्यांच्या विचाराच्या उमेदवारांना निवडून देतील, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

शिवसेना कोणी काढली, बाळासाहेबानंतर शिवसेना कोणी पाहिली सर्वांना माहित आहे. आमदार, खासदार किंवा मंत्रीपद वाटताना सर्व निर्णय मातोश्री आणि मुंबईतील शिवसेना भवनातून घेतले जात होते. मी महाराष्ट्रात फिरतो त्यावेळी सर्वसामान्य शिवसैनिक हा उद्धव ठाकरे यांना मानणार असल्याचं अजित पवार म्हणाले. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही यावर आपली प्रतिक्रिया देताना निकाल धक्कादायक असल्याचं सांगितलं.

विश्वास कोणावर ठेवायचा काही कळत नाहीये, निवडणूक आयोग पारदर्शक आहे. हा निर्णय कसा झाला, ज्या शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरे यांनी केली त्यांनीच हयात असताना माझ्यानंतर उद्धव ठाकरे शिवसेना पाहतील असं सांगितलं होतं. त्यामुळे हा निर्णय धक्कादायक असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

दरम्यान,  केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे आता सुप्रीम कोर्टामध्ये जाणार असल्याचं म्हणाले आहेत.