शाळांबाबत मोठी बातमी! सोमवारपासून पुन्हा शाळा सुरु होणार? शिक्षण मंत्र्यांचा नेमका काय प्रस्ताव?

| Updated on: Jan 19, 2022 | 5:13 PM

ज्याठिकाणी रुग्णसंख्या कमी असेल, त्याभागातील तिथले स्थानिक प्रशासकीय अधिकारी यांच्या माध्यमातून शाळा सुरु ठेवण्याबाबतचा निर्णय घेतला जावा. तसे अधिकार दिले जावे, याबाबतचा प्रस्ताव मुख्ममंत्र्यांकडे पाठवण्यात आला आहे, असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

शाळांबाबत मोठी बातमी! सोमवारपासून पुन्हा शाळा सुरु होणार? शिक्षण मंत्र्यांचा नेमका काय प्रस्ताव?
वर्षा गायकवाड
Follow us on

मुंबई : येत्या सोमवारपासून शाळा (School in Maharashtra) सुरु केल्या जाण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे ऑफलाईन वर्ग बंद करण्यात आले होते. दरम्यान, आता पुन्हा एकदा शाळा सुरु करण्याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना शिक्षणमंत्र्यांनी दिली आहे. मोठ्या प्रमाणात शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षकांकडून शाळा सुरु करण्याची मागणी होतेय. ज्याठिकाणी रुग्णसंख्या कमी असेल, त्याभागातील तिथले स्थानिक प्रशासकीय अधिकारी यांच्या माध्यमातून शाळा सुरु ठेवण्याबाबतचा निर्णय घेतला जावा. तसे अधिकार दिले जावे, याबाबतचा प्रस्ताव मुख्ममंत्र्यांकडे पाठवण्यात आला आहे, असं वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे कोविड लसीकरण पूर्ण करुन घेणं, शिक्षकांच्या दोन्ही लसी पूर्ण करणं, या गोष्टीवरही भर देण्याचा प्रयत्न प्रस्तावातून देण्यात आला आहे, अशी माहिती शिक्षणंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर वर्ग बंद

कोरोनाच्या तिसऱ्या कोरोनाच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा पुन्हा ऑनलाईन करण्यात आल्या होत्या. शाळांचे ऑफलाईन वर्ग बंद करुन पुन्हा एकदा घरातून ऑनलाईन शाळा सुरु करण्यात आल्या होत्या. सगळ्यात आधी मुंबईतील शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर खबरदारी म्हणून अनेक पालिका क्षेत्रांनी आणि जिल्ह्यांमध्ये शाळा बंद करण्याचा निर्णय जाहीर केला होता. दरम्यान, आता कोरोना रुग्णवाढ पुन्हा कमी झाल्यामुळे तसंच किशोरवयीन मुलांच्या लसीकरणालाही वेग आल्यानं शाळा पुन्हा सुरु केल्या जाव्यात अशी मागणी जोर धरु लागली आहे. मात्र धोका अजूनही टळलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासकीय अधिकारी यांच्याकडे शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार दिले जावेत, असा प्रस्ताव देण्यात आला आहेत. या प्रस्तावावर आता मुख्यमंत्री काय निर्णय घेतात, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

महाराष्ट्रातल्या वाढत्या रुग्णवाढीनं चिंता

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता चिमुकल्यांचं लसीकरण होण अत्यंत गरजेचं आहे. अशातच शाळेतील मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग पसरु नये यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला होता. अखेर याबाबत आता पुन्हा हालचालींना आला असून शाळा सुरु करण्याबाबत प्रस्ताव देण्यात आला आहे. संपूर्ण खबरदारी घेत शालेय मुलांचं कोणतंही नुकसान होऊ नये, यासाठी शिक्षण मंत्र्यांकडून प्रयत्न सुरु आहेत. त्या पार्श्वभूमीवर येत्या सोमवारपासून शाळा सुरु होतात का, याकडे विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि पालकांचंही लक्ष लागलंय.

संबंधित बातम्या :

चटणीशिवाय momo खाण्यास कुत्र्याचा नकार, व्हिडीओ व्हायरल; नेटकरी म्हणतात…

काळजाचा तुकडा अखेर सापडला! बेपत्ता स्वर्णव चव्हाण अखेर सुरक्षित परतला, 10 दिवस होता कुठे?

Kolhapur Crime | कोल्हापूरचा अजब चोर ! थेट न्यायाधीशांचे चोरायचा कपडे, पोलिसांनी नेमकं कसं पकडलं ?