नंदकिशोर गावडे, Tv9 मराठी, मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची भेट घेतल्याची माहिती समोर आलीय. धनंजय मुंडे यांचा चार दिवसांपूर्वी परळीत अपघात (Dhananjay Munde Aciident) झाला होता. या अपघातानंतर त्यांना मुंबईत उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. धनंजय यांच्यावर सध्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) उपचार सुरु आहेत. धनंजय यांना आणखी काही दिवस ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी राहावं लागणार आहे. या दरम्यान महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेत्यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी कालच धनंजय मुंडे यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज भाजप नेत्या आणि धनंजय यांच्या बहीण पंकजा मुंडे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाल्या.